रशियातील अणूऊर्जा संशोधन प्रकल्पासाठी भारतीय विद्यार्थ्यांची निवड

कौस्तुभ आणि रितेश हे दोघंही केमिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून सध्या ते तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. या प्रकल्पासाठी जगभरातील १२ देशांमधून २६ जणांची निवड करण्यात आलीय. त्यात कौस्तुभ आणि रितेशचीही निवड झालीय. या निवडीबद्दल त्यांचं सगळीकडून अभिनंदन होतंय.

रशियातील महत्त्वाकांक्षी अणूऊर्जा प्रकल्पासाठी भारतातील दोन विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. रशियाच्या जॉईंट इन्स्टिट्युट ऑफ न्यूक्लिअर रिसर्च या संस्थेचे अगोदरपासूनच विद्यार्थी असणारे कौस्तुभ वाडेकर आणि रितेश रेड्डी या विद्यार्थ्यांची प्रकल्पासाठी निवड झालीय.

कौस्तुभ आणि रितेश हे दोघंही केमिकल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी असून सध्या ते तिसऱ्या वर्षात शिकत आहेत. या प्रकल्पासाठी जगभरातील १२ देशांमधून २६ जणांची निवड करण्यात आलीय. त्यात कौस्तुभ आणि रितेशचीही निवड झालीय. या निवडीबद्दल त्यांचं सगळीकडून अभिनंदन होतंय.

कौस्तुभ आणि रितेश यांनी स्वतःची आयसोल मेथड डेव्हलप केली आहे. या मेथडचा उपयोग हेवी बीम रिऍक्शनचा अभ्यास करण्यासाठी केला जातो. या मेथडच्या आधारेच या दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे या दोघांनी त्यांच्या मेथडचे सादरीकरण ऑनलाईनच केले होते.

जेआयएनआर ही आंतरराष्ट्रीय संस्था विज्ञानातील संशोधनासाठी जगविख्यात आहे. इथे झालेल्या संशोधनांचा उपयोग करून जगभरात अनेक प्रकल्प प्रत्यक्ष साकारले जातात. या संस्थेला जगभरातील २३ हून अधिक देश सहकार्य करत असतात.