india pakistan border

गेल्या ८ वर्षांपासून(Two Indians Came Back From Pakistan) पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या दोन भारतीय नागरिकांना वाघा सीमेवर बीएसएफ (BSF) जवानांकडे सोपविण्यात आले.

    गेल्या आठ वर्षांपासून बेकायदेशीरपणे सीमा ओलांडल्यामुळे पाकिस्तानच्या(Pakistan) तुरुंगात असलेले २ भारतीय नागरिक देशात परत आले आहेत. गेल्या ८ वर्षांपासून(Two Indians Came Back From Pakistan) पाकिस्तानच्या तुरुंगात बंद असलेल्या दोन भारतीय नागरिकांना वाघा सीमेवर बीएसएफ (BSF) जवानांकडे सोपविण्यात आले.२०१३ मध्ये शर्मा राजपूत आणि राम बुहादार यांनी काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरून पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश केला होता. पाकिस्तानी रेंजर्सने त्यांना अटक केली होती.

    या दोघांनी नकळत सीमा ओलांडली होती. यांची छायाचित्रे आणि इतर दाखले भारतासोबत शेअर करण्यात आले होते. भारताने या दोघांना नागरिक म्हणून स्वीकारले आणि त्यानंतर पाकिस्तानने त्यांना सोमवारी बीएसएफच्या स्वाधीन केले.तसेच कथित हेरगिरी आणि बेकायदेशीर सीमा ओलांडण्याच्या आरोपाखाली एक वर्षापूर्वी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अटक केलेल्या १९ भारतीय नागरिकांची प्रकरणे अजूनही फेडरल रिव्ह्यू बोर्डाकडे प्रलंबित आहेत.