killing 20 soldiers in a terrorist attack

पहिला हल्ला बलुचिस्तानमध्ये झाला. त्यात रॉकेट लॉन्चरसह शस्त्रसस्ज सात दहशतवाद्यांनी सरकारी मालकीच्या ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ताफ्यावर हल्ला चढवला. त्यात सीमावर्ती भागात तैनात असणारे आणि या ताफ्याला संरक्षण देणारे सात सैनिक आणि सात खासगी सुरक्षा रक्षक ठार झाले. ओरमाराजवळ कोस्टल महामार्गावर हा हल्ला करण्यात आला. मात्र, कंपनीचे कर्मचारी या हल्ल्यात सुरक्षित राहिले.

इस्लामाबाद : भारताविरोधात कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना (terrorist ) आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागत आहे. बलुचिस्तान आणि वजिरीस्तानच्या आदिवासी भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात  (terrorist attack) सहा लष्करी जवानांसह २० सुरक्षा ( killing 20 soldiers in a terrorist attack) जवान ठार झाले आहेत. तेल कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या ताफ्यावर हे हल्ले (attack) करण्यात आले.

पहिला हल्ला बलुचिस्तानमध्ये झाला. त्यात रॉकेट लॉन्चरसह शस्त्रसस्ज सात दहशतवाद्यांनी सरकारी मालकीच्या ऑईल अँड गॅस डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या ताफ्यावर हल्ला चढवला. त्यात सीमावर्ती भागात तैनात असणारे आणि या ताफ्याला संरक्षण देणारे सात सैनिक आणि सात खासगी सुरक्षा रक्षक ठार झाले. ओरमाराजवळ कोस्टल महामार्गावर हा हल्ला करण्यात आला. मात्र, कंपनीचे कर्मचारी या हल्ल्यात सुरक्षित राहिले. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या संघटनेने हे हल्ले घडवले असावेत असा संशय आहे. हे हल्ले घडवून बलुचिस्तानचे स्थैर्य आणि शांततेला बाधा पोहोचवण्याचे प्रयत्न यशस्वी होऊ दिले जाणार नाहीत, असे पाकिस्तानी लष्कराने सांगितले.

दुसरा हल्ला वजिरीस्तानमधील राझमाक येथे लष्कराच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. त्यात सहा सैनिक मरण पावले. त्यात एका अधिकाऱ्याचा समावेश आहे. दोन दिवसांपुर्वीही या भागात केलेल्या हल्ल्यात दोन सैनिक मरण पावले होते. उत्तर वजिरीस्तान आणि दक्षिण वजिरीस्तान भागात हिंसक घटनांमध्ये वाढ झाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानने बंदी घातलेल्या ‘तेहरीक-ए-तालिबान’ या संघटनेने घेतली आहे. अनेक लहान दहशतवादी संघटना, गट ‘तेहरीक-ए-तालिबान’ या संघटनेत एकत्र आले आहेत. ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तान लष्करांवर त्यांनी हल्ले सुरू आहेत.