दोन हजार कैदी जेल मधुन फरार; प्रशासनाची झोप उडाली

नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात काहींनी पोलिस आणि लष्कराच्या इमारतीवर गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारानंतर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून एकाच वेळी दोन हजार कैद्यांनी पलायन केले असल्याचे समोर आले आहे.

    नायजेरिया :  नायजेरियाच्या दक्षिण-पूर्व भागात काहींनी पोलिस आणि लष्कराच्या इमारतीवर गोळीबार करत हल्ला केला. या गोळीबारानंतर या ठिकाणी असलेल्या तुरुंगातून एकाच वेळी दोन हजार कैद्यांनी पलायन केले असल्याचे समोर आले आहे.

    हा हल्ला ओवेरी शहरात झाला. जवळपास दोन तास गोळीबार सुरू होता, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. या हल्ल्यामध्ये सरकारी इमारतींचे नुकसान झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

    अद्याप कोणत्याही संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली नाही. मात्र, या हल्ल्यामागे फुटीरतावादी गट जबाबदार असल्याचे पोलिस महानिरीक्षकांनी म्हटले आहे.