इजिप्तमध्ये दोन ट्रेनची जोरदार धडक ; ३२ जणांचा मृत्यू तर ६६ जण जखमी

मिस्त्र शहरातील सोहागच्या उत्तरेला काल (शुक्रवारी) दोन ट्रेनची धडक झाली. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले जात आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    इजिप्तमध्ये दोन ट्रेनची जोरदार धडक झाल्याची माहिती मिळत आहे. या भीषण अपघातात ३२ जणांचा मृत्यू झाला असून ६६ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मिस्त्र शहरातील सोहागच्या उत्तरेला काल (शुक्रवारी) दोन ट्रेनची धडक झाली. यामध्ये आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. तसेच जखमींना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल केले जात आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

    वेगाने बचावकार्य सुरू असून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. तसेच मिस्त्रचे आरोग्यमंत्री घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींमधील अनेकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र त्यातील काहींच प्रकृती ही अत्यंत चिंताजनक आहे.