संयुक्त राष्ट्रांकडून भारताच्या कोरोना लढ्याचं कौतुक, लसींबद्दल मानले आभार

कोरोनाविरुद्धची लढाई आणि कोरोनावरील लसीच्या संशोधनाचा आणि वितरणाचा वेग याबाबतीत भारतानं जगात सर्वोत्तम कामगिरी केल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांनी काढलेत. भारताने युनायटेड नेशन्सकडे २ लाख कोरोनाचे डोस पाठवून दिले होते. त्याबद्दल आपण भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे जाहीर आभार मानत असल्याचं संयु्क्त राष्ट्रसंघानं म्हटलंय. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमुर्ती यांनी ही माहिती दिलीय. 

    कोरोनानं गेल्या ११ महिन्यांपासून जगभर धुमाकूळ घातला. भारतातही कोरोनाचे अनेक बळी गेले. मात्र ज्या देशांनी कोरोनाविरुद्धची लढाई निकराने लढली, त्यात भारताचा समावेश होत असल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रसंघानं काढलेत.

    कोरोनाविरुद्धची लढाई आणि कोरोनावरील लसीच्या संशोधनाचा आणि वितरणाचा वेग याबाबतीत भारतानं जगात सर्वोत्तम कामगिरी केल्याचे गौरवोद्गार संयुक्त राष्ट्रसंघाच्या सचिवांनी काढलेत. भारताने युनायटेड नेशन्सकडे २ लाख कोरोनाचे डोस पाठवून दिले होते. त्याबद्दल आपण भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचे जाहीर आभार मानत असल्याचं संयु्क्त राष्ट्रसंघानं म्हटलंय. भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी टी. एस. त्रिमुर्ती यांनी ही माहिती दिलीय.

    भारतात आतापर्यंत १ कोटी लोकांपेक्षा अधिकजणांना कोरोनाची लस देण्यात आलीय. शुक्रवारी रात्रीपर्यंत नोंदवल्या गेलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत १ कोटी लोकांनी कोरोनाचा डोस घेतला आहे. असा विक्रम करणारा भारत हा जगातील दुसरा देश ठरला आहे. अमेेरिकेत यापेक्षाही वेगाने लसीकरण करण्यात आले आहे. मात्र विकसनशील देशांच्या यादीत हा वेग गाठणारा भारत पहिला देश ठरला आहे.

    सध्या भारतात दरदिवशी १० हजार जणांना कोरोनाची लस दिली जाते. लवकरच हा वेग वाढणार असून काही दिवसात दर दिवशी ४० हजार ते ५० हजार जणांना कोरोना लस देणं शक्य होणार आहे. भारताला १ कोटी नागरिकांना लस देण्यासाठी ३४ दिवस लागले. तर अमेेरिकेनं हाच पल्ला ३१ दिवसांत गाठला होता. भारतासारख्या भौगोलिक वैविध्य असलेल्या देशात हा वेग लक्षणीय असून पुढील काही दिवसांत हा वेग कमालीचा वाढणार असल्याचा विश्वास आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केलाय.

    आतापर्यंत सुमारे ६३ लाख आरोग्य कर्मचारी आणि ३४ लाख फ्रंटलाईन वर्कर्सना कोरोनाची लस देण्यात आलीय. तर सुमारे ७ लाख ६० हजार जणांना कोरोनाची दुसरी लसही देण्यात आलीय. गुरुवारी एकाच दिवशी सर्वाधिक लसीकरणाची विक्रम नोंदवला गेला. गुरुवारी एकूण ६ लाख ५८ हजार ६७४ जणांना कोरोनाची लस देण्यात आली.