H-1B व्हिसावर काही प्रमाणात सूट देण्याची ट्रम्प सरकारची घोषणा; ‘यांना’ होणार फायदा

America H-1B Visa: २२ जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षासाठी H1-B व्हिसा निलंबित होणार असल्याची घोषणा केली होती. यामुळे भारतासह जगातील आयटी प्रोफेशनलला हा मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. आता यात काही प्रमाणात सूट देण्यात आली आहे.

वॉशिंग्टन : ट्रम्प प्रशासना (Trump Administration) ने  H-1B व्हिसा (H1b Visa) च्या काही नियमात सूट देण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे व्हिसा धारकांना अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे.विशेषत: व्हिसा प्रतिबंधामुळे ज्या लोकांनी अमेरिकेतील नोकरीवर पाणी सोडले होते. जर हे लोक त्याच ठिकाणी नोकरीवर परतणार असतील तर त्यांना या निर्णयामुळे मिळालेली सूट फायद्याची ठरणार आहे. प्राथमिक व्हिसा धारकाची पत्नी आणि मुलांनाही त्याच्यासोबत प्रवासाची मुभा दिली आहे अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

एच-1बी व्हिसा नियमांमध्ये सूट देण्याची घोषणा

अमेरिकेत व्हिसा नियमांमुळे जे लोक नोकरी सोडून गेले होते आणि ते पुन्हा त्याच ठिकाणी रूजू होणार असतील आणि त्यांनी तसा अर्ज केला आहे. अशाच लोकांना एच -1 बी व्हिसाच्या काही नियमांमध्ये सूट देण्याच्या नियमांचा फायदा होणार आहे. प्रशासनाने तांत्रिक विशेषज्ञ, वरिष्ठ-स्तरावरील व्यवस्थापक आणि अन्य कर्मचारी ज्यांच्याकडे एच -1 बी व्हिसा आहे अशाच लोकांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. यामुळे फक्त अमेरिकेत तात्काळ आणि निरंतर आर्थिक सुधारणा होण्याच्या दृष्टीने हे आवश्यक ठरणार आहे.

२२ जूनला ट्रम्प यांनी H1-B व्हिसा केला होता निलंबित

२२ जूनला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या वर्षासाठी H1-B व्हिसा निलंबित करण्याची घोषणा केली होती. यामुळे भारतासह जगातील आयटी व्यावसायिकांना मोठा धक्का असल्याचे मानले जात होते. आता अमेरिका प्रशासनाने व्हिसा प्रतिबंधात काही प्रमाणात सूट दिली आहे. यामुळे एच -1 बी व्हिसा धारकांना काही शर्तींवर अमेरिकेत प्रवेश करण्याची परवानगी मिळणार आहे. 

H1-B व्हिसा नियमांत सूट दिल्याने यांना होणार फायदा

ट्रम्प प्रशासनाने अशाच व्हिसा धारकांना प्रवास करण्याची मुभा दिली आहे जे कोविड-19 महामारीचा प्रभाव कमी करण्यासाठी कार्यरत आहेत. विशेषत: येथील लोकांचे आरोग्य आणि आरोग्य व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. अमेरिकेत कोरोना संकटामुळे परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. अशात अमेरिका सरकारने एच-1 बी व्हिसाबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

H-1B व्हिसा म्हणजे काय?

एच-1बी व्हिसा एक अप्रवासी व्हिसा आहे. अमेरिकेत कार्यरत कंपन्यांना हा व्हिसा कुशल अशा कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी देण्यात येतो. ज्यांची येथे कमतरता आहे. हा व्हिसा ६ वर्षांसाठी वैध असतो. अमेरिकन कंपन्यांची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय आयटी प्रोफेशनल्सना सर्वाधिक H1-B व्हिसा देण्यात येतो.