new baby

2020 मध्ये एकीकडे जग कोरोना संक्रमणाशी लढा देत असतानाच याच काळात सुमारे 14 लाख नवजातांचा अनियोजित जन्म झाला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषाने(यूएनएफपीए) जारी केलेल्या अहवालानुसार 2020 मध्ये कोरोनाने कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील महिलांच्या जीवनावर परिणाम केला असून यादरम्यान सुमारे 14 लाख अनियोजित नवजात मुलेदेखील जन्माला आली आहेत.

    संयुक्त राष्ट्र :  2020 मध्ये एकीकडे जग कोरोना संक्रमणाशी लढा देत असतानाच याच काळात सुमारे 14 लाख नवजातांचा अनियोजित जन्म झाला आहे. संयुक्त राष्ट्र लोकसंख्या कोषाने(यूएनएफपीए) जारी केलेल्या अहवालानुसार 2020 मध्ये कोरोनाने कमी व मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील महिलांच्या जीवनावर परिणाम केला असून यादरम्यान सुमारे 14 लाख अनियोजित नवजात मुलेदेखील जन्माला आली आहेत.

    अहवालानुसार कोरोना लॉकडाऊन दरम्यान प्रवासी निर्बंध, आरोग्य सुविधांमध्ये अडथळा आणल्यामुळे कुटुंब नियोजन सुविधांमध्ये अडथळा निर्माण झाला होता. ही ताजी आकडेवारी बऱ्याच देशांमधून पुढे आली आहे.

    विशेषत: अधिक उत्पन्न असलेल्या देशांतून ही प्रकरणे सर्वाधिक नोंदवली गेली आहेत. इतकेच नाही तर युएनएफपीएने म्हटले आहे की, अनियोजित गर्भधारणेमुळे साथीच्या संबंधित आर्थिक बोजाशी झुंजणाऱ्या कुटुंबांवर मोठा परिणाम झाला.

    या काळात असुरक्षित गर्भपात होण्याचे प्रमाणही वाढले. तातडीने कार्यवाही न केल्यास परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही पुढे सांगितले गेले.