Upon hearing of the discovery of a diamond in a village in South Africa, large numbers of people went to the mountains and began digging in search of diamonds

दक्षिण आफ्रिकेतील एका गावात हिरा आढळल्याची बातमी ऐकून मोठ्या संख्येने लोक डोंगराळ भागात गेले आणि हिऱ्यांच्या शोधात खोदकाम करू लागले. आपल्यालाही हिरा मिळेल, या आशेने दुरून लोक याठिकाणी आले. हिरे मिळविण्यासाठी या लोकांनी दिवसरात्र खोदकाम सुरूच ठेवले. मात्र, आता या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

    दिल्ली : दक्षिण आफ्रिकेतील एका गावात हिरा आढळल्याची बातमी ऐकून मोठ्या संख्येने लोक डोंगराळ भागात गेले आणि हिऱ्यांच्या शोधात खोदकाम करू लागले. आपल्यालाही हिरा मिळेल, या आशेने दुरून लोक याठिकाणी आले. हिरे मिळविण्यासाठी या लोकांनी दिवसरात्र खोदकाम सुरूच ठेवले. मात्र, आता या सर्वांच्या अपेक्षांवर पाणी फेरले आहे.

    पूर्व दक्षिण आफ्रिकेतील क्वाजुलु-नतालमध्ये एका डोंगरावर आढळलेल्या एका चमकदार धातूला लोक हिरा समजत होते. मात्र, प्रत्यक्षात हा केवळ एक चमकदार दगड असल्याचे समोर आले आहे. सुरुवातीच्या तपासात समोर आले, की हा दगड क्वार्ट्ज क्रिस्टल आहे. जनावरांनी चरण्यासाठी डोंगरावर घेऊन गेलेल्या एक व्यक्तीला याठिकाणी एक चमकदार दगड आढळला.

    हा दगड हिरा असल्याचे त्या व्यक्तीला वाटले. यानंतर लोक हिरा शोधण्यासाठी डोंगरावर गेले आणि खोदकाम सुरू केले. मात्र, आता सुरुवातीच्या तपासात असे समोर आले आहे, की डोंगरावर आढळलेला हा धातू हिरा नसून केवळ एक चमकदार दगड आहे. याची किंमतही हिऱ्याच्या तुलनेत अतिशय कमी आहे. डोंगरावर गर्दी जमल्यानंतर सरकारने जियो सायनटिस्ट आणि मायनिंग एक्सपर्ट्ला सँपल कलेक्ट करण्यासाठी पाठवले. यानंतर हे दगड हिरे नसल्याचे स्पष्ट झाले.