US court rejects petition against PM Narendra Modi, plotted by Khalistanists

अमेरिकेत टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये १९ सप्टेंबर २०१९ मध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली होती. कार्यक्रम पार पडल्यावर खलिस्तानी गटातील दोन व्यक्तींनी मोदींच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती.

वॉशिंग्टन : भारतातील जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० रद्द केल्यानंतर अमेरिकेच्या न्यायालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि अमित शाह यांच्याविरोधात १० करोड डॉलरची याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु ही याचिका अमेरिकेच्या टेक्सासमधील न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयात सुनावणी असताना याचिकाकर्ता दोन वेळेस गैरहजर असल्यामुळे ही याचिका न्यायालयाने फेटाळल्याचे सांगण्यात आले आहे.

हाऊडी मोदी कार्यक्रमानंतर दाखल करण्यात आली होती याचिका

अमेरिकेत टेक्सासमधील ह्युस्टनमध्ये १९ सप्टेंबर २०१९ मध्ये हाऊडी मोदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मोदींनी हजेरी लावली होती. कार्यक्रम पार पडल्यावर खलिस्तानी गटातील (Khalistanists)  दोन व्यक्तींनी मोदींच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेत जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याच्या निर्णयाला अव्हान देण्यात आले होते.

पंतप्रधानांसह या दिग्गज नेत्यांकडून नुकसान भरपाईचा दावा

याचिका कर्त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि लेफ्टनेंट जनरल कंवल जीत सिंह ढिल्लों यांच्याविरोधात १० करोड डॉलर नुकसान भरपाई देण्याचा दावा याचिकेत केला होता. कंवल जीत सिंह ढिल्लों हे सध्या ‘डिफेन्स इंटेलिजन्स एजन्सी’ चे डायरेक्टर जनरल आणि सीडीएस अंतर्गत ‘इंटिग्रेटेड डिफेन्स स्टाफ’ चे उपप्रमुख आहेत.

टेक्सास कोर्टाने फुटीरतावाद्यांची याचिका फेटाळली

दक्षिण अमेरिकेच्या टेक्सास कोर्टाचे न्यायाधीश फ्रान्सिस एच. स्टेसी यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, काश्मीर खलिस्तान जनमत मोर्चाने या खटल्याचा पाठपुरावा करण्यासाठी काहीही केले नाही. या खटल्याच्या सुनावणीसाठी दोनदा तारीख निश्चित केली गेली पण ते हजर झाले नाही. यासह न्यायाधीशांनी खटला फेटाळून लावला. या प्रकरणात ‘काश्मीर खलिस्तान जनमत मोर्चा’ वगळता अन्य दोन याचिकाकर्त्यांची ओळख पटलेली नाही.