पूर्व अफगाणिस्तानात अमेरिकेचा ड्रोन हल्ला ; ISIS-Kच्या कबूलमधील दहशतवादी हल्ल्याला दिले सडेतोड उत्तर

अमेरिकी सैन्यांनी ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवले जात आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याने आयएसचे किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    काबूल:अफगाणिस्तानातील काबूल(Kabul) विमानतळवर गुरूवारी रात्री झालेल्या आत्मघातकी बॉम्ब स्फोटात १७० होऊन अधिक नागरिक मारले गेले. यामध्ये अमेरिकेच्या १३ सैनिकांचा समावेश होता. या हल्ल्याची जबाबदारी इसिस -खुरासान (ISIS-K)या दहशतवादी गटाने स्वीकारली होती. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन(US President Joe Biden) यांनी या हल्लेखोरांना शोधून मारून असे म्हटले होते. त्याचप्रमाणे अमेरिकेने इसिसच्या कृतीला सडेतोड उत्तर देत पूर्व अफगाणिस्तानात ड्रोन हल्ला (US drone strikes )केल्याचे वृत्त समोर आले आहे. पेंटागननं याबद्दलची माहिती दिली आहे.

    यूएस सेंट्रल कमांडचे प्रवक्ते कॅप्टन बिल अर्बन यांनी याबाबतची माहिती देताना सांगितले, की अमेरिकी सैन्यांनी ISIS-K प्लॅनरच्या विरोधात दहशतवादविरोधी अभियान चालवले जात आहे. इस्लामिक स्टेट खुरासनने काबूल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. मात्र, अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्याने आयएसचे किती नुकसान झाले याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

    न्यूयॉर्क टाइम्सनं दिलेल्या वृत्तानुसार,अमेरिकन लष्करानं हा हल्ला नानगहर प्रांतात केला आहे. सुरक्षेच्या दृष्टीनं अमेरिकेच्या नागरिकांना विमानतळाच्या वेगवेगळ्या गेट्समधून तात्काळ बाहेर काढण्यास सांगण्यात आले आहे.