अमेरिकेने लसींवरील निर्यातबंदी उठवली, भारताला लसी मिळण्याचा मार्ग मोकळा, हॅरिस-मोदी चर्चेत भारताला आश्वासन

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारताला अतिरिक्त लसी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालंय. अमेरिकेने आपल्या लसीकरणाबाबतच्या धोरणात बदल केले असून देशात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त लसींचा साठा इतर देशांना पाठवण्याचा निर्णय झाल्याचं हॅरिस यांनी म्हटलंय. 

    भारतात सध्या कोरोनाची दुसरी लाट अजूनही धुमाकूळ घालत असून पुढील काही दिवस ही लाट संपायला लागतील, असा अंदाज वर्तवण्यात येतोय. लसीकरण हाच कोरोनावरील प्रभावी उपाय असून लवकरात लवकर अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण करणं गरजेचं असल्याचं सांगितलं जातंय. मात्र भारतात लसींची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेकदा लसीकरणात अडथळे येत आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं इतर देशांना लसी पुरवण्याचा घेतलेला निर्णय भारतासाठी दिलासादायक मानला जातोय.

    अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर भारताला अतिरिक्त लसी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं स्पष्ट झालंय. अमेरिकेने आपल्या लसीकरणाबाबतच्या धोरणात बदल केले असून देशात निर्माण होणाऱ्या अतिरिक्त लसींचा साठा इतर देशांना पाठवण्याचा निर्णय झाल्याचं हॅरिस यांनी म्हटलंय.

    भारतात तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसींचं उत्पादन वाढवण्यासाठी सप्लाय चेनच्या माध्यमातून मदत करण्याचं आश्वासनही अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी दिलंय. त्यामुळं कोव्हिशिल्डचं उत्पादन वाढून त्याची निर्यात पूर्ववत व्हावी, यासाठी अमेरिका प्रयत्नशील असल्याचं दिसतंय. मात्र त्याचा फायदा भारतालादेखील होणार आहे.

    अमेरिकेत तयार होणाऱ्या लसी गरजू देशांना पुरवणं ही अमेरिकेची प्राथमिकता असून जगात कोरोनाने सर्वाधिक प्रभावित झालेल्या भारताला त्यातील मोठा वाटा मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून ही माहिती दिलीय. त्यामुळे भारतात आता स्पुटनिक व्ही, बायोलॉजिकल ई आणि फायझरनंतर आता अमेरिकेतील इतर काही लसींचा पुरवठा होण्याची चिन्हं आहेत.