महिलांनी बुरखा घातला तर बलात्कार होणार नाहीत, पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांची मुक्ताफळं, सोशल मीडियावर चहुबाजूंनी टीका

बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलांनी बुरखा घालणं गरजेचं असल्याचं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय. या विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झालीय. पाकिस्तानमधील कायदा सुव्यवस्था धोक्यात असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान महिलांनाच असे अनाहूत सल्ले कसे काय देऊ शकतात, असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केलाय. परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसल्याचंच यावरून इम्रान खान सिद्ध करत असल्याची टीका होतेय. 

    पाकिस्तानमधील गुन्हेगारीत गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असून बलात्काराचे अनेक गुन्हे नोंदवले जात आहेत. एकीकडे कोरोनाचा फैलाव होत असताना महिलांबाबतच्या गुन्हेगारीच्या अनेक घटना नोंदवल्या जात आहेत. यावर उपाययोजना करण्यात अपयशी ठरलेले पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एका वादग्रस्त विधानानं नवा वाद ओढवून घेतलाय.

    बलात्कारापासून वाचण्यासाठी महिलांनी बुरखा घालणं गरजेचं असल्याचं मत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलंय. या विधानानंतर त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका सुरू झालीय. पाकिस्तानमधील कायदा सुव्यवस्था धोक्यात असताना त्यावर उपाययोजना करण्याऐवजी पंतप्रधान महिलांनाच असे अनाहूत सल्ले कसे काय देऊ शकतात, असा सवाल नेटिझन्सनी उपस्थित केलाय. परिस्थितीवर आपलं नियंत्रण नसल्याचंच यावरून इम्रान खान सिद्ध करत असल्याची टीका होतेय.

    इम्रान खान हे एका बिकीनीतील तरुणीसोबत समुद्रकिनारी मौजमजा करत असल्याचा जुना व्हिडिओ या निमित्तानं सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होऊ लागलाय. इम्रान खान यांच्या तरुणपणातला हा व्हिडिओ असला तरी पाकिस्तानी जनतेनंच आता त्यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केलीय. इम्रान खान महिलांना बुरखा परिधान करण्याचा सल्ला देत आहेत, मात्र या व्हिडिओत ते तरुणीसोबत अंघोळ करताना दिसत आहेत, अशी टीका सोशल मीडियावरून होताना दिसत आहे.

    वाढत्या अश्लिलतेला युरोप आणि भारत जबाबदार असल्याचंही इम्रान खान यांनी म्हटलंय. दिल्लीला बलात्काराची राजधानी समजलं जातं, तर युरोपात अश्लिलतेमुळं कुटुंब व्यवस्थाच धोक्यात आल्याचा दावा इम्रान खान यांनी केलाय.