3 वर्षांच्या मुलांचे लसीकरण! चीन ठरला पहिला देश

सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला चीनने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून आता ही लस तीन वर्षांच्या बालकांना देण्यात येणार आहे. असे करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.

    वुहान : सिनोवॅक बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीला चीनने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली असून आता ही लस तीन वर्षांच्या बालकांना देण्यात येणार आहे. असे करणारा चीन हा जगातील पहिला देश ठरला आहे.

    तूर्त चीनमध्ये 18+ वयोगटातील लोकांचेच लसीकरण केले जात आहे. तथापि, चीन सरकारने अद्याप लहान मुलांच्या लसीकरणाबाबतची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. सिनोवॅक लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

    यात लहान मुलांच्या शरीरात कोरोना विरोधी अँटीबॉडी तयार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पहिल्या डोसनंतर मुलांमध्ये 10 पट अँटीबॉडी तयार होत असल्याचेही दिसून आले आहे.