व्हॅक्सीन आम्ही आमच्या पैशाने आणि तज्ज्ञांकडून बनवतो; बिल गेट्स यांच्या वक्तव्याने भारताला झटका

संपूर्ण जग कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. या कठीण काळात सध्या लसच या जीवघेण्या व्हायरसपासून वाचवण्याचा परिणामकारक उपाय मानले जात आहे. परंतु, या दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील टॉपचे बिझनेसमन बिल गेट्स या गोष्टीवरून टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विकसनशील देशांसोबत लसीचा फार्म्युला सामायिक करू नये, असे विधान त्यांनी केले आहे.

  दिल्ली : संपूर्ण जग कोरोना संसर्गाशी लढा देत आहे. या कठीण काळात सध्या लसच या जीवघेण्या व्हायरसपासून वाचवण्याचा परिणामकारक उपाय मानले जात आहे. परंतु, या दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सह-संस्थापक आणि जगातील टॉपचे बिझनेसमन बिल गेट्स या गोष्टीवरून टीकेच्या केंद्रस्थानी आले आहेत. विकसनशील देशांसोबत लसीचा फार्म्युला सामायिक करू नये, असे विधान त्यांनी केले आहे.

  भारत आणि अमेरिकेत फरक

  एका मुलाखतीमध्ये बिल गेट्स यांना विचारण्यात आले की, व्हॅक्सीनवरील इंटॅलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटची सुरक्षा हटवली गेली आणि ती जगातील देशांसोबत फार्म्युला सामायिक केला गेला तर यामुळे सर्वांपर्यंत लस पोहचण्यास मदत मिळेल का? यावर बिल गेट्स यांनी सहजपणे ‘नाही’ असे म्हटले. जगात व्हॅक्सीन बनवणाऱ्या अनेक फॅक्टरी आहेत आणि लोक लसीच्या सुरक्षेबाबत खूपच गंभीर आहेत. तरीसुद्धा औषधाचा फॉर्म्युला सामायिक करू नये. अमेरिकेची जॉन्सन अँड जॉन्सनची फॅक्टरी आणि भारताच्या फॅक्टरीत अंतर आहे. व्हॅक्सीन आम्ही आमच्या पैशाने आणि तज्ज्ञांकडून बनवतो.

  लस बनविताना सावधगिरी बाळगणे आवश्यक

  बिल गेट्स यांनी पुढे म्हटले की, व्हॅक्सीनचा फॉर्म्युला रेसिपीप्रमाणे नाही की तो कुणासोबतही सामायिक केला जाऊ शकतो आणि हे केवळ बौद्धिक संपत्तीचे प्रकरण आहे. ही व्हॅक्सीन बनवण्यात खूप सावधगिरी बाळगावी लागते, टेस्टिंग करावी लागते, तिची ट्रायल व्हावी लागते. व्हॅक्सीन बनविताना प्रत्येक वस्तू खूप सावधगिरीने पहावी आणि तपासावी लागते.

  वक्तव्यावर टीका

  बिल गेट्स यांच्यावर या वक्तव्यामुळे मोठी टीका होत आहे. ब्रिटन येथील युनिव्हर्सिटी ऑफ असेक्समध्ये लॉच्या प्रोफेसर तारा वान हो यांनी ट्विट केले की, बिल गेट्स म्हणत आहेत की, भारतात लोकांचा मृत्यू रोखला जाऊ शकत नाही. पश्चिम कधी मदत करेल? वास्तवात अमेरिका आणि ब्रिटनने विकसनशील देशांची मान दाबली आहे. हे खुप घृणास्पद आहे. याशिवाय ग्लोबल जस्टिस नाऊचे संचालक निक डेयर्डन, पत्रकार स्टीफन बर्नी यांच्यासह अनेकांनी टीका केली आहे.