man turning head in 180 degree

सोशल मीडियावर अशा एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video)  होतोय ज्याची मान १८० डिग्री(Man Turns His Neck In 180 Degree) फिरते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    आपण अनेकदा विचित्र पद्धतीने मान फिरवणारी भूतं हॉरर चित्रपटांमध्ये पाहिली आहेत. त्या भूतांची मान तंत्रज्ञानाचा वापर करुन कुठेही आणि कशीही फिरताना आपण पाहतो.मात्र सोशल मीडियावर अशा एका माणसाचा व्हिडिओ व्हायरल(Viral Video)  होतोय ज्याची मान १८० डिग्री(Man Turns His Neck In 180 Degree) फिरते. हा व्हिडिओ पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.

    काहींचं शरीर इतकं लवचिक असतं की त्यात हाडं आहेत की नाही असाच प्रश्न पडतो. अगदी रबरासारखे ते कशीही हालचाल करू शकतात. अशाच एका तरुणाचा हा व्हिडीओ. संबंधित तरुणाने आपलं टिकटॉक हँडल @sheaabutt00 वर हा व्हिडीओ शेअर केला आहे.

    व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक तरुण उभा आहे. आपल्या दोन्ही हाताने तो आपलं तोंड धरतो. पुढे असलेला चेहरा तो पाठीमागे नेतो. त्यानंतर हात सोडतो तर त्याचं डोकं पुन्हा ज्या स्थितीत होतं त्या स्थितीत येतं. जणू काही त्याच्या मानेला स्प्रिंगच लावलेली आहे.

    हा स्टंट पाहायला जितका भयानक आहे तितकाच करायलाही धोकादायक आहे. त्यामुळे असा प्रयोग कुणीही घरी करून नको ते संकट ओढवून घेऊ नका ही विनंती.