Video :पिझ्झा पार्टी तीही अंतराळात! ; पाहा तरंगणारा पिझ्झा

अंतराळवीर थॉमस पेस्केट याने पिझ्झा पार्टीचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करताना लिहिलंय, मित्रांसोबत फ्लोटिंग पिझ्झा नाईट. पृथ्वीवरचा शनिवारच जणू. एक चांगला शेफ कधीही त्याचे रहस्य उघड करत नाही, परंतु मी एक व्हिडीओ बनवला आहे.

  तरंगणारा पिझ्झा…आणि सोबत सहकारी … अशी पिझ्झा पार्टी तुम्हाला आवडेल का? सध्या अंतराळातील पिझ्झा पार्टीची सर्वत्र चर्चा रंगली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) गेलेले अंतराळवीर फ्लोटिंग पिझ्झा नाईटचा आनंद घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ बघून लोक अचंबित झाले आहेत.अंतराळात गुरुत्वाकर्षणाच्या अभावामुळे साध्या वाटणाऱया गोष्टी करणे कठीण असते, मात्र अंतराळ स्थानकात अंतराळवीरांनी चक्क पिझ्झा तयार करून खाल्ला. गुरुत्वाकर्षण नसल्याने पिझ्झा अंतराळात तरंगताना दिसत आहे.

  View this post on Instagram

  A post shared by Thomas Pesquet (@thom_astro)