विजय मल्ल्या भिकेला लागला; वकिलाची फी भरायलाही  पैसे नाहीत!

भारतीया बँकांना कोट्यावधीचा चुना लावून विजय मल्ल्याने परदेशात धूम ठोकली. या प्रकरणी लंडनमध्ये त्याच्या केस सुरु आहे. मात्र हातात एक पैसा नसल्याने वकिलांची फी कशी द्यायची असा प्रश्न मल्ल्याला पडला आहे. 

नवी दिल्ली :  भारतीय बँकेचं कर्ज बूडवून परदेशात पळून गेलेला विजय मल्ल्या आता भिकेचे डोहाळे लागले आहेत. विजय मल्ल्याकडे सध्या वकिलाची फी भरायलाही  पैसे  नसल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे आता पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी त्याची धडपड सुरु आहे.

भारतीया बँकांना कोट्यावधीचा चुना लावून विजय मल्ल्याने परदेशात धूम ठोकली. या प्रकरणी लंडनमध्ये त्याच्या केस सुरु आहे. मात्र हातात एक पैसा नसल्याने वकिलांची फी कशी द्यायची असा प्रश्न मल्ल्याला पडला आहे.

पैशांचा प्रश्न सुटावा यासाठी त्याने यु.के.च्या कोर्टात एक तातडीचा अर्ज दाखल केला आहे.  बँक अकाऊंट हाताळण्याची संमती मल्ल्याने या अर्जामध्ये मागितली आहे. फ्रान्समध्ये असणारी संपत्ती विकल्यानंतर आलेल्या पैशांमधील १४ कोटी रूपये देण्यात यावेत असंही त्याने या अर्जात नमूद केले आहे.

विजय मल्ल्या भारतातून फरार झाल्यानंतर त्याची सर्व बँक खाती गोठवण्यात आली होती. मात्र, आता पैसे नसल्याने ही खाती पुन्हा कार्यान्वित करण्यात यावीत अशी मागणीही मल्ल्याने कोर्टाकडे केली आहे.

वेळेत फी दिली नाही तर न्यायालयात खटला लढणार नसल्याचे विजय मल्ल्याच्या वकिलाने  सांगितले आहे. वकिलाची फी भरण्यासाठी पैसे हवे असल्याचे मल्ल्याने अर्जात म्हटले आहे.