
आपल्या समोर जर अचानक वाघ आला तर.... कल्पना करूनच घाबरगुंडी उडते.. मात्र जपानमध्ये एक व्यक्ती चक्क खोटा वाघ बनून खऱ्या वाघांच्या प्राणिसंग्रहालयात गेला.. आणि पुढे काय झाले असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही.. सध्या या खोट्या वाघाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा माणूस वाघाचे कपडे घालून प्राणिसंग्रहालयात फिरत आहे. या माणसाला अशा कपड्यात पाहून कदाचित तेथील खरेखुरे वाघही भांबावले आहेत.
आपल्या समोर जर अचानक वाघ आला तर…. कल्पना करूनच घाबरगुंडी उडते.. मात्र जपानमध्ये एक व्यक्ती चक्क खोटा वाघ बनून खऱ्या वाघांच्या प्राणिसंग्रहालयात गेला.. आणि पुढे काय झाले असेल याची आपण कल्पनाच करू शकत नाही.. सध्या या खोट्या वाघाचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा माणूस वाघाचे कपडे घालून प्राणिसंग्रहालयात फिरत आहे. या माणसाला अशा कपड्यात पाहून कदाचित तेथील खरेखुरे वाघही भांबावले आहेत.
नेमकं काय आहे प्रकरण?
प्राणिसंग्रहालयातून अनेकदा वाघ पळून जातात. अशा वेळी तेथे काम करणा-या कर्मचा-यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशावेळी येथील वाघांना पळण्याची प्रक्रिया समजवण्यासाठी हा सर्व घाट घातला होता.प्राणिसंग्रहालयातील वाघांना पळण्याची प्रक्रिया समजवण्यासाठी हे एक प्रकारचे सेफ्टी ड्रिल ठेवण्यात आले होते. हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे
Tobe Zoo in Aichi conducted a lion escape drill today.
Note the expression on the actual lions faces.
pic.twitter.com/azuJYQhLCw— Spoon & Tamago (@Johnny_suputama) June 22, 2019
या सेफ्टी ड्रिलमध्ये ख-या ऐवजी खोट्या वाघाचा वापर करण्यात आला. कारण ख-या वाघासोबत असे करणे फार जोखमीचे काम आहे. त्यामुळे एका व्यक्तीने वाघाचे कपडे घालून हे तेथील कर्मचा-यांच्या मदतीने हे सेफ्टी ड्रिल केले. हा व्यक्ती वाघाच्या वेषात वाघाप्रमाणे प्राणिसंग्रहालयात सैरावैरा पळू लागला. त्याला पकडणा-या लोकांवर हल्ला केला. हा सर्व नजारा तेथील खरे वाघ पाहत होते.या खोटा वाघ बनलेला माणूस फिरत असताना एक व्हॅन तिथे येते आणि त्याच्यावक ट्रैंक्विलायजर ने हल्ला करते. ज्यामुळे तो वाघ जमीनीवर पडतो. त्यानंतर तेथील कर्मचारी मोठ्या छडीने त्या खोट्या वाघाला तपासून पाहतात तो शुद्धीत आहे की नाही. हे सेफ्टी ड्रील तेथील वाघ पाहत होते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर धुमाकूळ घालत आहे.