टिकटॉकच्या माध्यमातून ऑनलाइन बाजारात वॉलमार्टची चाचपणी

न्यूयॉर्क : वॉलमार्ट (Walmart) जगातील सर्वात मोठी रिटेलर कंपनी आहे. पण अमेझॉनचा ऑनलाइन असलेला दबदबा कमी करण्यात हिचे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. याचं उत्तर वेगाने वाढत असलेली तीन वर्षे जुनी व्हिडिओ ॲप टिकटॉक (TikTok) आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald trump) प्रशासनाला टिकटॉकच्या अमेरिकेतील व्यवसायाची विक्री करायची आहे. टिकटॉकचा मालकी हक्क चीनची कंपनी बाइटडान्सकडे आहे आणि ट्रम्प प्रशासनाचा दावा आहे की, यामुळे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. पण, टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसायाची मालकी स्वत:कडे घेण्याच्या स्पर्धेत अनेक कंपन्या आहेत परंतु तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्ट (Microsoft) सोबत वॉलमार्टला या स्पर्धेत पुढे जाण्याची इच्छा आहे.

टिकटॉकचा ई-कॉमर्स व्यवसाय खूपच छोटा आहे पण अमेरिकेत युजर्सची संख्या १० कोटी आहे. जी देशातील लोकसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश आहे. यातील बहुतांश खरेदीदार तरुणवर्ग आहे. आणि त्यांच्यापर्यंत पोहोचायचे तर पारंपारिक मीडिया आणि जाहिरातींच्या माध्यमातून पोहोचणे शक्यच नाही. भिन्न ब्रँडसाठी ऑनलाइन मार्केटप्लेस तयार करणाऱ्या व्हीटॅक्सचे मुख्य धोरण अधिकारी अमित शहा यांच्या मते, वॉलमार्ट किंवा अमेझॉनचे भविष्यातील ग्राहक तेच असतील, जे टिकटॉक सादर करेल. पण विश्लेषक एका गोष्टीबद्दल आशावादी आहेत, टिकटॉकच्या मदतीने वॉलमार्ट ऑनलाइन शॉपिंग बाजारात उतरू शकतो. लॉजिस्टिक्स अँड टेक्नॉलॉजी फ्रंट आणि टेक्नॉलॉजी फ्रंटवर मायक्रोसॉफ्टच्या मदतीने वॉलमार्ट ऑनलाईन बाजारामध्ये आपली उपस्थिती बळकट करू शकेल असा त्यांचा विश्वास आहे. (एजन्सी)