Warning to citizens as it rains, a strange crisis on Florida residents

नाताळ आणि आगामी आठवडा फ्लोरिडातील तापमान उणे ३० ते ४० डिग्री राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडणार आहे. फ्लोरिडातील इगुआना पालींच्या जातीला थंडी अजिबात सोसत नाही. त्यामुळे या पाली झाडावरुन गारठून खाली पडतात.

फ्लोरिडा : कोरोना संकटामुळे आदीच जगभरातील सगळेच देश त्रस्त झाले आहेत. त्यात आता निसर्गाच्या बदलत्या चक्रामुळेही संकटे येत आहेत. फ्लोरिडामध्ये (Florida) नाताळ आणि पुढील आठवडा संकटाचाच ठरत आहे. यामुळे फ्लोरिडाच्या प्रशासनाने तेथील नागरिकांना धोक्याचा आणि सावधानतेचा इशारा दिला (Warning to citizens ) आहे. गरज लागल्यास घराबाहेर पडायचे आदेशही फ्लोरिडा सरकारने दिला आहे. कारण इथे चक्क पालींचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे नागरिकांना इजा होऊ शकते. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

नाताळ आणि आगामी आठवडा फ्लोरिडातील तापमान उणे ३० ते ४० डिग्री राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी पडणार आहे. फ्लोरिडातील इगुआना पालींच्या जातीला थंडी अजिबात सोसत नाही. त्यामुळे या पाली झाडावरुन गारठून खाली पडतात. या पाली लांब लचक, काटेरी आणि वजनदार असतात. यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या नागरिकांवर पडल्यास मोठा अपघात होऊ शकतो. यामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. या पाली एवढ्या संख्येने पडतात की जणू पालींचा पाऊसच पडतो आहे असे वाटते.

यातील काही पालींना पाठीवर काटे असतात. त्यांचे दात अतिशय तीक्ष्ण असतात आणि त्याच्यापासून माणसाला इजा होऊ शकते. या पाली गारठून रस्त्यांवर पडतात पण त्या मेलेल्या नसतात. सनशाईन स्टेट अशी ओळख असलेल्या फ्लोरिडा मध्ये या पाली १९६० मध्ये आणल्या गेल्या होत्या. या पाली खतरनाक असतात कारण यातील काही विषारी आहेत. या पालींमधील पूर्ण वाढीचा नर पाच फुट लांबीचा आणि २० पौंड वजनाचा असतो. या पालीच्या शरीराची बनावट वेगळी असते आणि त्यांचे आयुष्यमान सरासरी २० वर्षे आहे.