China loses power, fears of losing working hands: China's population growth slows over last 10 years

गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर कमी होत असल्याने नवी पॉलिसी लागू केली आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल पीपुल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा पारित केला आहे. चिनी दाम्पत्यांना तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    बीजिंग : लोकसंख्येवर देशाची आर्थिक गणिते बांधली जात असतात. लोकसंख्येचा थेट प्रभाव अर्थकारणावर पडत असतो. यामुळे लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचे अर्थतज्ज्ञांकडून सुचविले जाते. मात्र, जगात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या चीनला आता वृद्ध लोकसंख्येची चिंता सतावत आहे. त्यामुळे चीनने आतापासूनच पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. देशाच्या हितासाठी सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टीने तीन मुलांना जन्म देण्याची परवानगी दिली आहे. या पॉलिसीला शुक्रवारी औपचारिकरित्या समर्थन देण्यात आले आहे.

    गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर कमी होत असल्याने नवी पॉलिसी लागू केली आहे. गेल्या काही वर्षात चीनमध्ये जन्मदर घटला आहे. तसेच वयोवृद्ध लोकांची संख्या वाढत असल्याचे एका अहवालातून समोर आले. वयोवृद्ध लोकसंख्येमुळे भविष्यात परिणाम जाणवतील, या भीतीने चीन सरकारने हा निर्णय घेतला आहे. नॅशनल पीपुल्स काँग्रेसच्या स्थायी समितीने सुधारित लोकसंख्या आणि कुटुंब नियोजन कायदा पारित केला आहे. चिनी दाम्पत्यांना तीन मुले जन्माला घालण्याची परवानगी देण्यात आली आहे.

    चीनमध्ये वाढत्या महागाईमुळे दाम्पत्य मुलांना जन्म देताना विचार करत आहे. यासाठीही या कायद्यात सामाजिक आणि आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. नव्या कायद्यानुसार मुलांच्या पालनपोषणासाठी आणि त्यांच्या शिक्षणासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. तसेच कुटुंबावरील आर्थिक ओझे कमी करण्यासाठी कर, विमा, शिक्षण, रोजगारासाठी धोरणं आखली आहेत.