प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

तुम्ही अडचणीत असताना तुमच्या मदतीला धावून येणारी दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती म्हणजे तुमचे शेजारी असतात. ते तुमच्या सुख-दुःखात सहभागी होतात; पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने कोट्यधीश केले, ही बाब तुम्ही ऐकली आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही, असंही असू शकते; मात्र बर्लिनमध्ये ही बाब सत्यात उतरली आहे. एका महिलेने तिची 7.5 मिलियन डाॅलरची संपत्ती तिच्या शेजाऱ्यांच्या नावे करून दिली. यामुळे तो शेजारी क्षणातच कोट्याधीश झाला.

बर्लिन (Barlin).  तुम्ही अडचणीत असताना तुमच्या मदतीला धावून येणारी दुसऱ्या क्रमांकाची व्यक्ती म्हणजे तुमचे शेजारी असतात. ते तुमच्या सुख-दुःखात सहभागी होतात; पण एखाद्या व्यक्तीला त्याच्या शेजारी राहत असलेल्या व्यक्तीने कोट्यधीश केले, ही बाब तुम्ही ऐकली आहे का? कदाचित तुमचं उत्तर नाही, असंही असू शकते; मात्र बर्लिनमध्ये ही बाब सत्यात उतरली आहे. एका महिलेने तिची 7.5 मिलियन डाॅलरची संपत्ती तिच्या शेजाऱ्यांच्या नावे करून दिली. यामुळे तो शेजारी क्षणातच कोट्याधीश झाला.

शेजारी हा पहिला नातेवाईक असतो असं म्हणतात. कोणत्याही अडचणीत तो तुम्हाला मदत करण्यात सगळ्यात पुढे असतो. आपल्या सुख-दुःखात तो सहभागी होतो. पण, कुठल्या शेजाऱ्याने तुम्हाला कोट्यधीश केलं तर? असं खरोखर घडलं आहे. जर्मनीत राहणाऱ्या एका महिलेने आपली कोट्यवधींची संपत्ती शेजाऱ्यांना दान केली आहे. या संपत्तीची किंमत तब्बल 7.5 मिलियन डॉलर इतकी म्हणजेच तब्बल 55.35 कोटी इतकी आहे.

महिलेचा २०१९ मध्येच मृत्यू झाला
मध्य जर्मनीतील हेसे इथे राहणाऱ्या या महिलेचं नाव रेनेट वेडेल असं आहे. रेनेट या त्यांचे यजमान अल्फ्रेड वेसेल यांच्यासमवेत 1975 पासून जर्मनीत स्थायिक झाल्या होत्या. 2014मध्ये अल्फ्रेड यांचं निधन झालं. तेव्हापासून त्या एकट्याच राहत. 2016 ते 2019 दरम्यान आजारपणामुळे त्यांच्यावर इलाज सुरू होते, त्यातच त्यांचा वयाच्या 81व्या वर्षी मृत्यू झाला.

बहीण होती खरी वारस
रेनेट यांच्या नावे बँक खाती, शेअर्स आणि अनेक जंगम मालमत्ता होती, ज्याची खरी वारसदार त्यांची बहीण होती. मात्र, रेनेट यांच्या आधीच त्यांची बहीण मृत्यू पावली होती. त्यामुळे रेनेटने त्यांची सारी स्थावर आणि जंगम मालमत्ता आपल्या शेजाऱ्यांना देऊन टाकली. एप्रिल 2020मध्ये स्थानिक प्रशासनाने त्यांच्या शेजाऱ्यांना या संपत्तीची कल्पना दिली. रेनेट यांच्या बहिणीचा मृत्यू आधीच झाला असल्याने ही मालमत्ता त्यांच्या शेजाऱ्यांच्या नावे करण्यात आली.

त्यांच्या संपत्तीतील एका घराचा वारसा ज्यांच्याकडे जाणार होता, त्याने तो वारसा स्वीकारण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आता ही संपत्ती हेसे हे गाव ज्या जिल्ह्यात आहे, त्या वायपरफेल्डेनच्या नगरपालिकेने विकसित करण्यासाठी घेतली आहे. आता तिथे एक सामाजिक केंद्र उभं राहणार असून त्यातून लोकांना मदत केली जाणार आहे, अशी माहिती नगरपालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.