काय सांगता ? केवळ ५० लाखांत बेट विकणे आहे

जे बेट विकण्यासाठी काढले आहे तेथून दीड मैलावर मनुष्यवस्ती असून तिथे अवघे ३०० लोकच राहतात. या बेटावर मात्र कोणतीही मनुष्यवस्ती नाही. परंतु निसर्गसौंदर्याने नटलेल्या बेटावर डॉल्फिन, व्हेल, शार्कसारखे मासे आढळतात. नौकानयन व स्नॉर्कलिंग यांसारखे जलपर्यटन इथे विकसित करणे शक्य आहे.

    एडिनबर्ग : तुम्हाला जर कोणी सांगितले की, एखादे बेटच तुमचे होऊ शकते तर त्यावर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र आता हे स्वप्न पूर्ण होऊ शकते तेही केवळ ५० लाख रुपयांत. होय हे खरं आहे. स्कॉटलंडमध्ये चक्क एक बेट विकायला काढले आहे. कार्न डिएस असे २२ एकरांच्या बेटाचे नाव असून ते स्कॉटलंडच्या पश्चिमेला आहे. या बेटासाठी भारतीय चलनात केवळ ५० लाखांची बोली लावली आहे.

    अवघ्या ३०० लोकांची वस्ती