कधी सुधरणार हे पाकिस्तानी?Viral Video : पाक मंत्र्यांची अजब कृती ; दातानेच तोडली उद्घाटनाची फीत

जाब प्रांताचे कारागृह मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते फयाज अल हसन चौहान यांनी लिहिले- 'तुमच्या विधानसभा मतदारसंघात दुकान उघडण्याची संधी अनोखी शैली ... !!! कात्री बोथट आणि वाईट होती ... !!! दुकानदाराला पेचातून वाचवण्यासाठी मी एक नवीन विश्वविक्रम केला ... !!! '

    पाकिस्तानच्या मंत्र्यांचे अनेक किस्से आपण अनेकदा ऐकतो बघतो. मात्र आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तो व्हिडीओ पशूं सगळेच पाकिस्तानच्या या मंत्र्याला सुधारा रे हे आवर्जून म्हणतील. तर व्हिडीओमध्ये पंजाब प्रांतातील कारागृहमंत्री फयाज अल हसन चोहान चक्क दाताने फीत कापताना दिसत आहे. हा व्हिडीओ खुद्द मंत्री फयाज यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की,’आपल्या क्षेत्रात दुकानाचं उद्घाटन करण्याचा अनोखा अंदाज’.

    पंजाब प्रांताचे कारागृहमंत्री फयाज अल हसन चौहान एका शोरूमचे उद्घाटन करण्यासाठी आले होते, जिथे मंत्री उद्घटनादरम्यान फित कापणार होते, परंतु त्यांनी ते कात्रीने कापली नव्हती. यानंतर, मंत्र्याने आपल्या हातांनी रिबन पकडली आणि चक्क दाताने रिबन कापली. मंत्री फयाजचा हा पराक्रम पाहून, लोकं मोठ मोठ्याने हसू लागले.

     

    हा व्हिडिओ स्वतः शेअर करताना पंजाब प्रांताचे कारागृह मंत्री आणि सरकारचे प्रवक्ते फयाज अल हसन चौहान यांनी लिहिले- ‘तुमच्या विधानसभा मतदारसंघात दुकान उघडण्याची संधी अनोखी शैली, कात्री बोथट आणि वाईट होती. दुकानदाराला पेचातून वाचवण्यासाठी मी एक नवीन विश्वविक्रम केला ‘