कोरोना व्हायरस चीनच्या प्रयोगशाळेतून आला की नाही? WHO ने दिलं हे उत्तर

जगभरात कोट्यवधी नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या व्हायरसचा जन्म चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याची शंका सातत्यानं उपस्थित होत आहे. चीननं मुद्दाम किंवा अपघातानं हा व्हायरस तयार केल्याचं सांगितलं जातं. यातलं तथ्य पडताळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक टीम वुहानमध्ये गेली आणि तिथं त्यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना आढळलेल्या शोधांची माहिती या टीममधील सदस्यांनी जाहीर केली.

    कोरोना व्हायरसनं जगात धुमाकूळ घालायला सुरूवात केली, त्याला आता एक वर्षापेक्षा जास्त काळ लोटलाय. चीनमधून आलेल्या या रोगानं बघता बघता जगभर आपला प्रभाव पाडला. जगातील प्रगत, विकसनशील आणि अविकसित अशा सर्व देशांना कोरोना व्हायरसचा जबरदस्त फटका सहन करावा लागला.

    जगभरात कोट्यवधी नागरिकांचे प्राण घेणाऱ्या या व्हायरसचा जन्म चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेत झाल्याची शंका सातत्यानं उपस्थित होत आहे. चीननं मुद्दाम किंवा अपघातानं हा व्हायरस तयार केल्याचं सांगितलं जातं. यातलं तथ्य पडताळण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची (WHO) एक टीम वुहानमध्ये गेली आणि तिथं त्यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना आढळलेल्या शोधांची माहिती या टीममधील सदस्यांनी जाहीर केली.

    चीनमधल्या वुहानमधील प्रयोगशाळेत कोरोनचा विषाणू तयार केल्याचे किंवा चुकून तयार झाल्याचे कुठलेही पुरावे उपलब्ध नाहीत, असं जागतिक आरोग्य संघटनेच्या टीमनं सांगितलंय. वुहान दौऱ्यावर गेलेल्या टीममधील एक सदस्य मॅरिऑन कुपमन्स यांनी लंडनमध्ये एका कार्यक्रमात याबाबतीत खुलासा केलाय. वुहानमधील प्रयोगशाळेतून हा विषाणू पसरला असण्याची शक्यता अगदीच धूसर असल्याचं त्यांनी म्हटलंय.

    एखाद्या विषाणूचं मूळ जन्मस्थान शोधणं हे प्रचंड आव्हानात्मक काम असल्याचं त्यांनी सांगितलंय. १९७६ साली इबोला व्हायरसची पहिल्यांदा लागण झाली होती. त्यानंतर वटवागळांमधून तो विषाणू आल्याचं सांगितलं जातं. मात्र आतापर्यंत वटवाघळांमध्ये कधीही इबोलाचा जिवंत विषाणू आढळला नाही. त्याचप्रमाणे कोरोनाचा विषाणूदेखील प्राण्यांमधून मानवी शरीरात आला असण्याची शक्यता अधिक आहे. मात्र ते सिद्ध होण्यासाठी काही वर्षं जावी लागतील, असं त्यांनी म्हटलंय.