कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर लसीचा प्रभाव नाही, WHO च्या दाव्याने सगळ्यांची उडाली झोप

भविष्यामध्ये कोरोना विषाणूचे(Corona Virus) नवीन पद्धतीचे व्हेरियंट पाहायला मिळतील. या व्हेरियंटवर(New Variant Of Corona) लस(Vaccine) प्रभावी ठरणार नाही अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.

    सध्या परिस्थितीमध्ये जगभरातील कोरोना लसींपैकी(Corona Vaccine) जवळजवळ सर्वच लसी या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटवर(Delta Variant Of Corona) परिणामकारक नसल्याचे समोर येत आहे. या संदर्भातील माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी सांगितलं आहे.

    भविष्यामध्ये कोरोना विषाणूचे नवीन पद्धतीचे व्हेरियंटही पाहायला मिळतील. या व्हेरियंटवर लस प्रभावी ठरणार नाही अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे जगभरामध्ये कोरोनाविरुद्ध लढ्यात लसीकरणाचा प्राधान्य दिलं जात असून जास्तीत जास्त लोकांचं लसीकरण करण्याचे सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

    सध्या लसीकरणामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेड होत राहणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणाऱ्या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणाऱ्या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नाही, असं मत मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी व्यक्त केलं आहे. भविष्यात या विषाणूला म्युटेड होण्याची संधीच उपलब्ध होऊ न देण्यासंदर्भात संशोधन होणं गरजेचं असल्याचंही मारिया यांनी म्हटलंय.

    डेल्टा व्हेरियंट किंवा बी.१.६१७.२ व्हेरियंटमुळेच भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम दिसून आल्याचं मानलं जात. आकडेवारीनुसार यूनायटेड किंग्डममध्ये सध्या तिसरी लाट आली असून त्यासाठी हा डेल्टा व्हेरिएंटच जबाबदार आहे. आता डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये झालं आहे. भारतामध्ये सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. डेल्टा प्लसचे महाराष्ट्रामध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. केरळमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आलेत.

    यापूर्वी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अहवालांमध्ये भारतात देण्यात येणाऱ्या कोविशील्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्टा व्हेरियंटविरोधात खूप कमी प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडी निर्माण करतात. मात्र डेल्टा व्हेरियंट सोडल्यास या लसी इतर व्हेरियंटवर प्रभावी असल्याचं सांगण्यात आले.

    अनेक संशोधनांमध्ये नवी डेल्टा व्हेरियंट हा लसींविरोधात जास्त प्रतिरोध करत असल्याचं दिसून आलं आहे. जूनच्या सुरुवातीला लॅन्सेच मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील एका संशोधनामध्ये डेल्टा, अल्फा (ब्रिटनमधील व्हेरिएंट) आणि बीटा (पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांमधील अ‍ॅण्टीबॉडीज आणि लसीच्या माध्यमातून तयार झालेल्या अ‍ॅण्टीबॉडीज यासंदर्भात तुलनात्मक संशोधन करण्यात आलेलं. लस या व्हेरियंटवर किती प्रभावी आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या जगभरामध्ये डेल्टा व्हेरियंटबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.