wuhan

वुहानमधून(wuhan) कोरोना(corona) व्हायरस जगभरामध्ये पसरला. मात्र या व्हायरसची उत्पत्ती नेमकी कशी झाली, हे शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना(WHO) करणार आहे.

वुहानमधून(wuhan) कोरोना(corona) व्हायरस जगभरामध्ये पसरला. मात्र या व्हायरसची उत्पत्ती नेमकी कशी झाली, हे शोधण्याचा प्रयत्न जागतिक आरोग्य संघटना(WHO) करणार आहे. कोरोनाच्या उत्पत्तीबाबत शोध घेण्यासाठी डब्ल्यूएचओची तज्ञांची १० जणांची टीम वुहानमध्ये दाखल झाली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार कामाला सुरुवात करण्याआधी टीमला दोन आठवडे क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.

कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीन देशातील वुहान शहरामध्ये आढळला होता.त्यानंतर जगाला कोरोनाचा विळखा बसला. जागतिक आरोग्य संघटनेची टीम चीनमध्ये दाखल झालेली आहे. मात्र वुहानमध्ये कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. कोरोना नियंत्रणात आणल्याचा दावा करणाऱ्या चीनमध्ये कोरोना वाढत असल्याने काही भागांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे. डब्ल्यूएचओची टीम चीनमधील वुहानमध्ये दाखल झाल्यानंतर कोरोना उत्पत्तीबाबत काय निष्कर्ष समोर येत आहेत याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहीले आहे.