त्या बाईने चक्क साखर घातलेलं गरम पाणी नवऱ्याच्या अंगावल ओतलं, पुढे काय झालं ते तुम्हीच बघा

एका पत्नीनं पलंगावर झोपलेल्या तिच्या पतीवर साखर घालून उकळलेलं पाणी(Wife Thrown Hot Sugar Water On Husband) ओतल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.

    पती-पत्नीमध्ये भांडण(Disputes Between Husband and Wife) होतच असतात. मात्र ही भांडण वेळेवर मिटली नाही आणि वाद विकोपाला गेला तर काहीतरी भलतंच होऊन बसतं. युकेमधील चेस्टरमध्ये खुनाचे असेच एक प्रकरण समोर आलं आहे. एका पत्नीनं पलंगावर झोपलेल्या तिच्या पतीवर साखर घालून उकळलेलं पाणी(Wife Thrown Hot Sugar Water On Husband) ओतल्याने पतीचा मृत्यू झाला आहे.

    या महिलेचं नाव कोरिना स्मिथ असं असून ती ५९ वर्षांची आहे. कोरीनाने एका बादलीत साखर टाकून उकळलेले पाणी आणूण तिच्या झोपलेल्या पतीच्या अंगावर ओतले. या घटनेत ८० वर्षांच्या मायकेल भाजले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. महिलेने नंतर शेजारील घरात जावून एका महिलेला आपण नवऱ्याच्या अंगावर पाणी ओतल्याचं सांगितलं, त्यामुळं कदाचित नवऱ्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगितले.

    अंगावर उकळलेले पाणी ओतल्यानं मायकल हे ३६ टक्के भाजले गेले होते. शेजारील संबंधित महिलेला पत्नीनं ही माहिती दिल्यानंतर ती ताबडतोब धावत त्यांच्या घरात आली आणि तिनं इतरांना याबाबत माहिती देवून तडफडणाऱ्या मायकल यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. मात्र, उपचार सुरू असताना मायकल यांचा मृत्यू झाला.

    घडलेल्या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित पत्नीला अटक करून चेस्टरच्या न्यायालयात दाखल केले असता तिची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. नुसत्या उकळलेल्या पाण्यापेक्षा साखर घातल्याने ती चिकटून बसेल आणि नवऱ्याला जास्त त्रास करण्याच्या हेतूने या महिलेनं पाण्यात साखर घालण्याचा प्लॅन केला होता.