Will not be fat until death; The father took the contract from the daughter

इंग्लंडमध्ये राहणारे 56 वर्षीय राचिद खादला हे फिटनेससाठी फारच वेडे आहेत. इतके की त्यांनी त्यांच्या मुलीकडून डॉक्युमेंट साइन करून घेतले. ज्यात दावा केला आहे की, त्यांची मुलगी मरेपर्यंत लठ्ठ होणार नाही. मुलीचे वजन वाढू नये यासाठी त्यांनी तिला मारहाण केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे मदतीने मुलीने कोर्टात प्रकरण दाखल केले आहे. यावर पुढील आठवडयात सुनावणी होणार आहे.

    इंग्लंड : मुलांना अनुशासन लागावे यासाठी पालकांचा सतत प्रयत्न असतो. यासाठी अनेकदा पालक कठोर निर्णय सुध्दा घेतात. मात्र एका वडिलाला अशाप्रकरचा कठोर निर्णय घेणे चांगलेच महागात पडले.

    इंग्लंडमध्ये राहणारे 56 वर्षीय राचिद खादला हे फिटनेससाठी फारच वेडे आहेत. इतके की त्यांनी त्यांच्या मुलीकडून डॉक्युमेंट साइन करून घेतले. ज्यात दावा केला आहे की, त्यांची मुलगी मरेपर्यंत लठ्ठ होणार नाही. मुलीचे वजन वाढू नये यासाठी त्यांनी तिला मारहाण केल्याचे समोर आले. त्यानंतर शेजारी राहणाऱ्या व्यक्तीचे मदतीने मुलीने कोर्टात प्रकरण दाखल केले आहे. यावर पुढील आठवडयात सुनावणी होणार आहे.

    23 वर्षीय अमीराने कोर्टात सांगितले होते की, तिचे वडील घरातील मुलांना फार जास्त कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात. अमीराने सांगितले की, वडिलच ठरवतात की, मी कोणते कपडे घालावे, कुणाला भेटावे, कुणासोबत मैत्री करावी आणि टीव्हीवर काय बघायचे. या निर्बंधामुळे मी फार तणावात आहे.

    ते फिटनेसबाबतही फार गंभीर आहेत. त्यांनी माझ्याकडून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतला आहे. वडिलाच्या निर्णयामुळे वैयक्तिक स्वातंत्र्र्य धोक्यात आल्याचा आरोप मुलीने केला. कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिले आहे की, मी, अमीरा स्वत:ला कधीही लठ्ठ होऊ देणार नाही. मी एक्सरसाइज करणार जेणेकरून मी कधीही लठ्ठ होणार नाही. मी मरेपर्यंत हा प्रयत्न करत राहणार की मी लठ्ठ होणार नाही. अमीरा म्हणाली की, यावर स्वाक्षरी केल्यापासून फार घाबरलेली आहे.