alcoholic ice cream

विल रॉजर्स(Will Rogers) या इन्व्हेंटरने Hinkley येथील आपल्या WDS Dessert Station मध्ये एक असं आईस्क्रिम तयार केलं आहे, ज्यात फ्रीजिंग फॉर्ममध्ये अल्कोहोल (Alcoholic Ice Cream) आहे.

    दारूपासून आईस्क्रीम तयार झालेलं तुम्ही कधी बघितलं आहे का ? विल रॉजर्स(Will Rogers) या इन्व्हेंटरने Hinkley येथील आपल्या WDS Dessert Station मध्ये एक असं आईस्क्रिम तयार केलं आहे, ज्यात फ्रीजिंग फॉर्ममध्ये अल्कोहोल (Alcoholic Ice Cream) आहे.

    शून्याखालील तापमानात (Below Zero Ice Cream Machine) आईस्क्रिम बनवणाऱ्या मशीनद्वारे त्यांनी ही कमाल केली आहे. विल रॉजर्स (Will Rogers) यांचं आईस्क्रिम पार्लर आहे. पार्लरमध्ये काम करत असताना त्यांना कॅफेनवालं आईस्क्रिम बनवण्याची कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करुन अल्कोहलसह एक अनोखं आईस्क्रिम तयार केलं. त्यांनी यासाठी अनेक दिवस आईस्क्रिम गम्स आणि याला सॉलिड करणाऱ्या केमिकल्सचा वापर केला. मात्र यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी NEA जेलद्वारे प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आता हे पेटेंटही केलं

    विल रॉजर्स म्हणाले की, NEA जेलद्वारे त्यांना अल्कोहल फ्रीज करण्यासाठी मदत मिळाली. त्यांनी सर्व गोष्टी Below Zero Ice Cream Machine मध्ये टाकल्या आणि ते फ्रीज होऊन तयार झालं. या जेलमध्ये अल्कोहल मिक्स झाल्यानंतर तेच आईस्क्रिम म्हणून समोर येतं.

    विल रॉजर्स यांनी सर्वात आधी लिक्विड नायट्रोजनद्वारे हे फ्रीज करण्याचा प्रयत्न केला. परंतु Below Zero Ice Cream Machine मशिनमध्ये अधिक चांगले रिझल्ट आले आणि आईस्क्रिम कोनमध्ये टाकून खाण्यासाठी तयार झालं. हे आईस्क्रिम खाल्यानंतर अल्कोहलचा तितकाच कंटेंट शरीरात जातो.

    तीस मिनिटाच्या आतच हे आईस्क्रिम तयार होतं. जितका अधिक अल्कोहल कंटेंट असतो, आईस्क्रिम बनवण्यासाठी तितकाच अधिक वेळ लागतो. विल रॉजर्स यांनी हे खास आईस्क्रिम अनेक ईव्हेंट्समध्ये सर्व्ह केलं आहे. हे अनोखं आईस्क्रिम बनवणाऱ्या मशिनची किंमत जवळपास सहा हजार अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्यांच्या मशिनला FDA अर्थात औषध आणि अन्न प्रशासनाकडून मंजुरीही मिळाली आहे.

    या अनोख्या आईस्क्रिममध्ये दुधाचा वापर होत नाही. Below Zero हे जगातील पहिलं अल्कोहोलिक आईस्क्रिम नसून याआधीही तीन वर्षांपूर्वी Buzz Pop Cocktails नावाने फळं आणि अल्कोहलपासून अशाप्रकारे आईस्क्रिम तयार करण्यात आलं होतं.