आधी काश्मीर जिंकू, नंतर भारतावर हल्ला ; शोएब अख्तर बरळला

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळला आहे. आम्ही आधी काश्मीर जिंकू आणि नंतर भारतावर हल्ला करू, अशी दर्पोक्ती त्याने केली आहे. शोएबचा एक व्हीडिओ व्हायरल होत असून यात तो 'गझवा-ए-हिंद' बाबत बोलत आहे.

लाहोर : पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर पुन्हा एकदा बरळला आहे. आम्ही आधी काश्मीर जिंकू आणि नंतर भारतावर हल्ला करू, अशी दर्पोक्ती त्याने केली आहे. शोएबचा एक व्हीडिओ व्हायरल होत असून यात तो ‘गझवा-ए-हिंद’ बाबत बोलत आहे. ‘गझवा-ए-हिंद’चा अर्थ ‘भारताविरोधात पवित्र युद्ध’ असा होतो. हदिथमध्ये याचा उल्लेख करण्यात आला आहे. आमच्या पवित्र पुस्तकामध्ये लिहिल्याप्रमाणे गझवा-ए-हिंद लवकरच तयार होईल. अफगाणिस्तानमधून सेना अटकेपर्यंत जाईल. अटकेच्या नदीचे पाणी दोनदा लाल होईल. उझबेकिस्तानमधून वेगवेगळ्या तुकड्या आमच्यात दाखल होतील. त्याचबरोबर आम्ही काश्मीर ताब्यात घेऊ आणि त्यानंतर भारतावर हल्ला करू, असे शोएब म्हणाला. शोएबच्या या वक्तव्यानंतर भारतीय चाहत्यांनी त्याला चांगलेच धारेवर धरले आहे.