३१ ऑगस्टपर्यंत सैन्य माघारी घ्या अन्यथा….. तालिबान्यांची अमेरिकेला धमकी

ऑगस्टनंतरही जर अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहण्यावर भर देत असतील तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्हाला त्यांनी कठोर पावले उचलण्यास भाग पडू नका

    काबुल: तालिबान्यांनी अफगाणिस्तान (Afghanistan -Taliban) ताब्यात घेतल्यानंतर तिथली परिस्थिती दिवसेंदिवस विदारक होत चालली आहे. अशातच तालिबान्यांनी अमेरिकेला सैन्य माघारी घेण्याबाबत थेट धमकी (Threaten) दिली आहे. ” अमेरिका (US) आणि ब्रिटेन (UK) यांनी युद्धग्रस्त देशातून अमेरिकेच्या नेतृत्वाखालील सैन्याच्या माघारीची तारीख ३१ ऑगस्टनंतरही पुढे वाढवली तर याचे गंभीर परिणाम सोसावे लागतील. महिन्याच्या अखेरीसची ठरलेली डेडलाईन शेवटची तारीख आहे आणि ही तारीख पुढे ढकलण्याचा अर्थ होईल की देशात ते आणखी जास्त दिवस थांबणार,असे कतरची राजधानी दोहा येथे स्काई न्यूजसोबत बातचीत करताना तालिबानचे प्रवक्ते डॉक्टर सुहैल शाहीने म्हटले आहे.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी नुकतेच ऑगस्ट महिना अखेरपर्यंत अमेरिकन नागरिक परत आणणार असल्याचे म्हटले आहे. यावर तालिबान्यांनी म्हटले आहे,  की ऑगस्टनंतरही जर अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमध्ये राहण्यावर भर देत असतील तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. आम्हाला त्यांनी कठोर पावले उचलण्यास भाग पडू नका” असेही शाहीने म्हणाले आहेत .