एकाच वेळी तब्बल 10 बाळांना जन्म दिल्याचा महिलेचा दावा; महिनाभरातच गिनीज बुकचा विक्रम मोडित

दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव गोसैमे थमारा सिठोल असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये या महिलेच्या पोटात आठ भ्रूण असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसूतीवेळी तिने दहा बाळांना जन्म दिल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. आफ्रिकन माध्यमांनुसार, सिटहोल आणि तिची मुले सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र आता महिनाभरानंतर हा विक्रम मोडला गेला आहे.

  केपटाऊन : दक्षिण आफ्रिकेतील एका महिलेने एकाच वेळी दहा बाळांना जन्म दिल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव गोसैमे थमारा सिठोल असे या महिलेचे नाव आहे. प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये या महिलेच्या पोटात आठ भ्रूण असल्याचे दिसून आले होते. मात्र, प्रसूतीवेळी तिने दहा बाळांना जन्म दिल्याचे पाहून तिच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. आफ्रिकन माध्यमांनुसार, सिटहोल आणि तिची मुले सुदृढ आहेत. काही काळ डॉक्टरांच्या देखरेखीखाली असतील. त्याचवेळी, सिटहोलने सांगितले की गर्भधारणेदरम्यान ती खूप आजारी पडली होती. ती वेळ तिच्यासाठी खूप कठीण होती. गेल्या महिन्यात मोरोक्कोमध्ये मालीच्या हलिमा सिसी नावाच्या महिलेने एकाच वेळी 9 मुलांना जन्म देऊन नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनविला होता. मात्र आता महिनाभरानंतर हा विक्रम मोडला गेला आहे.

  महिलेला यापूर्वीही झालीत जुळी

  विशेष म्हणजे यापूर्वीही महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला होता. तिला सहा वर्षांची दोन जुळी मुले आहेत. या दुसऱ्या प्रसूतीपूर्व चाचणीमध्ये जेव्हा डॉक्टरांनी आपल्याला सुरुवातील सांगितले की माझ्या पोटात एकापेक्षा जास्त भ्रूण आहेत, तेव्हा मला जुळे किंवा फार तर फार तिळे होतील अशी अपेक्षा होती. त्यानंतरच्या चाचणीत समोर आले की सहा भ्रुण आहेत; आणि त्याहीनंतरच्या चाचणीत समोर आले, की आठ भ्रूण आहेत. हे स्वीकारायला मला बराच वेळ लागला, असे मत या महिलेने व्यक्त केले.

  7 मुले, तीन मुलींचा समावेश

  प्राप्त माहितीनुसार, या बाळांपैकी सात मुले आणि तीन मुली आहेत. प्रसूतीवेळी ती सात महिन्यांची गर्भवती होती. तरीही, तिची प्रसूती नैसर्गिकरित्या झाली. या प्रसूतीनंतर आपण अगदीच भावनिक झाल्याचे मत तिचे पती टेबोहो त्सोतेत्सी यांनी व्यक्त केले.

  गिनिज बुकात होणार नोंद

  एकाच वेळी दहा मुलांना जन्म देण्याची ही जगातील पहिलीच घटना आहे. गिनीज बुकचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत. सध्या आई आणि बाळांची प्रकृती चांगली असणे हे आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे आम्ही आताच तेथे जाणार नाही. मात्र, ही बातमी खरी असली तर लवकरच या महिलेच्या नावावर विश्वविक्रम नोंदवला जाईल, असे गिनिज बुकच्या एका प्रवक्त्याने सांगितले.

  हे सुद्धा वाचा