Pregnant women without SEX cycle; The doctor found the answer in the medical checkup

नऊ वर्षांपूर्वी सारा रोगेल गार्सिया आठ महिन्यांची गर्भवती(Pregnant) होती, याचवेळी कपडे धुताना तिचा पाय घसरला आणि ती बेशुद्ध झाली होती. गार्सिया शुद्धीवर आली तेव्हा तिचे दोन्ही हात बेडला बांधून ठेवलेले होते. चार दिवसात ती आपल्या जखमांमधून बाहेर येण्याआधीच तिला तुरुंगवासाची शिक्षा(Punishment For Miscarriage ) सुनावली गेली.

    एका महिलेला दुर्घटनेत तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू (Woman Jailed for Miscarriage) झाल्यामुळे नऊ वर्ष तुरुंगवास भोगावा लागला आहे. ही महिला तुरुंगातून बाहेर आली असून तिनं सरकारकडे मागणी केली आहे, की गर्भपाताच्या (Law Against Miscarriage) कडक कायद्यांमध्ये बदल व्हायला हवा. जेणेकरून तिच्याप्रमाणेच इतर महिलांनाही विनाकारण शिक्षा भोगावी लागू नये.

    नऊ वर्षांपूर्वी सारा रोगेल गार्सिया आठ महिन्यांची गर्भवती होती, याचवेळी कपडे धुताना तिचा पाय घसरला आणि ती बेशुद्ध झाली होती. गार्सिया शुद्धीवर आली तेव्हा तिचे दोन्ही हात बेडला बांधून ठेवलेले होते. चार दिवसात ती आपल्या जखमांमधून बाहेर येण्याआधीच तिला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. कारण या घटनेत तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला होता.

    सारा रोगेल गार्सिया हिला वीस वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. नंतर ही शिक्षा कमी करून नऊ वर्ष करण्यात आली होती. सारा मागील महिन्यातच जामिनावर बाहेर आली आहे. ती म्हणाली की, महिलांनाही जगण्याचा हक्क आहे. माझ्यासोबत जे काही झालं ती केवळ एक दुर्घटना होती, यात माझी काहीही चूक नव्हती.

    साल्वाडोर येथे गर्भपाताबाबत अतिशय कडक कायदे आहेत. याच कारणामुळे गर्भपात करण्याची गरज निर्माण झाल्यास किंवा कोणत्याही दुर्घटनेत गर्भपात झाल्यास त्या महिलेकडे शंकेच्या नजरेनं पाहिलं जातं. डायरेक्टर ऑफ वुमेन राइट्स ग्रुपच्या सदस्या मोरेना हेरेरा म्हणाल्या, की रोगेल बाहेर आली असलू तरी अशाच प्रकारच्या आरोपांमुळे अनेक महिला अजूनही तुरुंगात आहेत.

    सारा नऊ वर्षांनी आपल्या घरी परतली आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवताना ती अत्यंत आनंदात आहे. ती म्हणाली, की आयुष्यात हा धडा मिळाला आहे, की मला माझ्या कुटुंबीयांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे आणि आयुष्य एन्जॉय करायचं आहे. सारानं असंही म्हटलं, की तिच्याप्रमाणेच आणखीही काही महिला तुरुंगात शिक्षा भोगत आहेत, त्यांचीही तिला मदत करायची आहे. तिनं म्हटलं, की मी त्या महिलांना वचन देऊन आले आहे की मी बाहेर निघताच तुम्हालाही तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करेल.