baby found in pregnancy operation

साऊथ ईस्ट लंडनच्या(South Eat London) बेक्सलेहीथमध्ये राहणारे जेनिस आणि डेनिअल. हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून मूल व्हावं(Trying For Baby) यासाठी ते प्रयत्न करत होते.

  ब्रिटन : ब्रिटनमधील दाम्पत्याला एक वेगळाच अनुभव आला आहे. कित्येक वर्षांपासून फक्त एका मुलासाठी (Child) प्रयत्न करणाऱ्या या दाम्पत्याने आई-बाबा होण्याची (Couple trying for baby) आशा सोडून दिली होती. पण अचानक त्यांच्या नकळत त्यांच्या पदरात बाळ (Shocking pregnancy) पडलं. अ‍ॅपेंडिक्सचं ऑपरेशन (Baby Found In Appendix Operation) करायला गेलेल्या महिलेच्या पोटाच चक्क बाळ सापडलं. यामुळे दाम्पत्यासह डॉक्टरांनाही धक्का बसला.

  साऊथ ईस्ट लंडनच्या बेक्सलेहीथमध्ये राहणारे जेनिस आणि डेनिअल. हे दाम्पत्य गेल्या दहा वर्षांपासून मूल व्हावं यासाठी ते प्रयत्न करत होते. सुरुवातीला त्यांनी मूल होण्यासाठी सामान्य मार्ग निवडला पण तरीही मूल होत नसल्याने त्यांनी आयव्हीएफचा मार्ग निवडला. पण तरीही त्यांना यश मिळालं नाही. अखेर त्यांनी आपण आई-बाबा होऊ ही आशाच सोडून दिली.

  काही दिवसांनी जेनिसच्या पोटात तीव्र वेदना होऊ लागल्या. या वेदना सातत्याने होत होत्या. तिचं वजनही झपाट्याने कमी होत होतं. जेनिसने अनेक डॉक्टरांना दाखवलं. तिने यानंतर तीन प्रेग्नन्सी टेस्ट केल्या. पण त्या निगेटिव्ह होत्या. तिच्या गेस्ट्रिकपासून न्यूमोनिया ते पोटाच्या इन्फेक्शनपर्यंत सर्व चाचण्या करण्यात आल्या. पण तिच्या आजाराचं निदान काही झालं नाही. अखेर जेनिसला अ‍ॅपेंडिक्स असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आणि सर्जरी करण्याचा सल्ला दिला.

  जेनिस आपल्या अ‍ॅपेंडिक्सच्या ऑपरेशनसाठी गेली. पण जेव्हा डॉक्टरांनी तिचं ऑपरेशन करायला घेतलं तेव्हा डॉक्टरांना जे दिसलं ते पाहून ते हैराण झाले. जेनिसलासुद्धा याची कल्पना नव्हती. तिच्या पोटात चक्क आठ महिन्यांचं बाळ होतं.

  जेनिसने सांगितल्यानुसार, ती ऑपरेशनची प्रतीक्षा करत होती. तिच्या पोटात तीव्र वेदना सुरूच होत्या. तिच्यावर लक्ष ठेवून असलेल्या नर्सने सांगितलं की जेनिसचं वॉटर ब्रेक झालं आहे आता ती कधीही आई होऊ शकते. डॉक्टर ज्याला अ‍ॅपेंडिक्स समजत होते, ते खरंतर आठ महिन्यांचं बाळ होतं.

  जेनिस आणि डेनिअल दोघांनी मूल होण्याची आशा सोडली होती आणि त्यांना अचानाक बाळ झालं. आई-बाबा होण्याचं स्वप्नं अखेर पूर्ण झालं. बाळाला कुशीत घेताच जेनिसला रडूच कोसळलं. आता हे दाम्पत्य आनंदी आहे. त्यांनी आपल्या बाळाचं नाव अराबेला ठेवलं आहे.