अफगाणिस्तानात महिलांनी ऑफिसला जाण्यास तालिबानचा विरोध – शरिया कायद्याचं कारण केलं पुढे

तालिबानने (Taliban)म्हटलं आहे की,अफगाणिस्तानात (Afghanistan) महिलांना पुरुषांसोबत काम करु दिलं जाणार नाही. देशात शरिया कायदा(Sharia Law) लागू होणार आहे.

    अफगाणिस्तानात (Afghanistan)सरकार स्थापन करण्यापुर्वी तालिबानने आमच्या राज्यात महिलांना पूर्ण स्वातंत्र्य(Freedom Of Women) असेल असा दावा केला होता. मात्र हा दावा आता फोल ठरला आहे. महिलांना ऑफिसला जाण्यास तालिबानने विरोध(Taliban Opposed Women To Work With men) केला आहे. तालिबानने आता स्पष्ट केलं आहे की, महिलांना बुरखा घालूनही ऑफिसला जाता येणार नाही. एका महिन्यातच तालिबानने आपल्या दाव्यापासून फारकत घेतल्याचं दिसून येत आहे.

    तालिबानने (Taliban)म्हटलं आहे की,अफगाणिस्तानात (Afghanistan) महिलांना पुरुषांसोबत काम करु दिलं जाणार नाही. देशात शरिया कायदा(Sharia Law) लागू होणार आहे. तालिबानचा कमांडर वहीदुल्लाह हाशिमी म्हणाला की, जगाने जरी आमच्यावर महिलांना काम करण्याचं स्वातंत्र्य देण्याबद्दल दबाव निर्माण केला तरीही अफगाणिस्तानात फक्त शरिया कायद्यानुसारच काम होईल.

    हाशिमीने सांगितलं की, आम्ही ४० वर्षे फक्त यासाठीच लढलो की आम्हाला देशात शरिया कायदा लागू करायचा होता. शरिया कायदा महिला आणि पुरुषांना एकत्र काम करण्याची परवानगी देत नाही. त्यामुळे महिला पुरुषांसोबत काम तर करु शकत नाहीतच, मात्र त्यांना आमच्या कार्यालयांमध्येही येण्याची परवानगी नाही. हाशिमी पुढे म्हणाला, ज्या क्षेत्रामध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर महिला काम करत आहेत त्या ठिकाणाहून त्यांना हटवण्याची गरज आहे. येणाऱ्या काळात महिलांना काम करण्यासाठी आणि अभ्यास करण्यासाठी वेगळी केंद्रं उभारली जातील, जिथे फक्त महिलांचा वावर असेल.