मुलांच्या भवितव्यासाठी जपानी आयांचा अनोखा उपक्रम, उभारली रॅडिएशन तपासणारी प्रयोगशाळा

जपानमध्ये झालेल्या रॅडिएशनच्या उत्सर्गानंतर फुकुशिमातील काही महिलांनी पुढच्या पिढीला या संसर्गापासून वाचवण्यासाठी कंबर कसलीय. त्यासाठी त्यांनी रॅडिएशनची पातळी मोजणारी प्रयोगशाळाच उभी केलीय. या प्रयोगशाळेत अन्नाची, जमिनीची, पाण्याची आणि इतर बाबींची रेडिएशन लेवल तपासली जाते आणि ती योग्य, सुरक्षित आहे की नाही, याची चाचपणी केली जाते.

    एखाद्या देशात आलेली आपत्ती त्या देशाचा वर्तमानकाळच नव्हे, तर भविष्यदेखील बदलून टाकते. कुठे महापूर येतो, कुठे वादळ येतं तर कुठे त्सुनामी येते. या आपत्तीनंतर संकटांकडे पाहण्याचा आणि अशा संकटांपासून पुढच्या पिढ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू होतात. जपानमध्ये असाच एक अनोखा उपक्रम काही महिलांनी सुरू केलाय.

    जपानमध्ये झालेल्या रॅडिएशनच्या उत्सर्गानंतर फुकुशिमातील काही महिलांनी पुढच्या पिढीला या संसर्गापासून वाचवण्यासाठी कंबर कसलीय. त्यासाठी त्यांनी रॅडिएशनची पातळी मोजणारी प्रयोगशाळाच उभी केलीय. या प्रयोगशाळेत अन्नाची, जमिनीची, पाण्याची आणि इतर बाबींची रेडिएशन लेवल तपासली जाते आणि ती योग्य, सुरक्षित आहे की नाही, याची चाचपणी केली जाते.

    बरोबर दहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०११ सालच्या मार्च महिन्यात जपानमध्ये झालेला भूकंप आणि आण्विक उत्सर्जनाने अक्षरशः मृत्युनं तांडव घातलं होतं. ११ मार्च २०११ या दिवशी भलीमोठी त्सुनामी जपानला धडकली होती. यामध्ये १८ हजारपेक्षा अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर फुकुशिमातील अणूप्रकल्पात झालेल्या रॅडिएशनमुळे हजारो जण गायब झाले होते आणि हजारो जणांना विस्थापित करावं लागलं होतं.

    भूूकंप आणि त्सुनामीपेक्षाही रॅडिएशनचा धोका पुढच्या पिढीला अधिक असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे रॅडिएशनचा अतिरेक होण्यापूर्वीच त्याची कल्पना यावी, यासाठी विविध महिलांनी एकत्र येत पुढच्या पिढीसाठी ही प्रयोगशाळा सुरु केलीय. यामध्ये प्रत्येक गोष्टीची रॅडिएशन लेवल तपासली जाते आणि नियंत्रणात असल्याची खात्री करून घेतली जाते.