मुलीने प्रियकरासोबत मिळून केली आईची हत्या, असं पडलं पितळं उघडं अन् झाली शिक्षा

एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या(Murder) केली आहे. हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकत ते दोघंही फरार झाले. या प्रकरणी संबंधित युवतीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

    इंडोनेशियामध्ये(Indonesia) एक भयानक घटना घडली आहे. एका तरुणीने आपल्या प्रियकरासोबत मिळून आपल्या आईची हत्या(Murder) केली आहे. हत्या केल्यानंतर आईचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून टॅक्सीमध्ये टाकत ते दोघंही फरार झाले. या प्रकरणी संबंधित युवतीला आणि तिच्या बॉयफ्रेंडला जन्मठेपेची शिक्षा (Life Imprisonment) सुनावण्यात आली आहे.

    इंडोनेशियामधील हीथर मॅक ही तरुणी टॉमी शेफरवर प्रेम करत होती. अशातच हीथर मॅक गर्भवती (Pregnant) राहिली. ही गोष्ट तिच्या आईला माहिती झाली. आईने  मुलीला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली.हीथरनं आपला प्रियकर (Lover) टॉमी शेफरसोबत मिळून आपल्या आईला शीला वॉन मॅकला मारण्याच्या प्लॅन तयार केला.

    हीथर आणि शेफर यांचं शीला वॉनसोबत बालीमध्ये एका हॉटेलमध्ये भांडण झालं. यानंतर शेफरनं हीथरची आई शीला वॉनच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार केला. यातच तिच्या आईचा मृत्यू झाला. हत्येनंतर महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून जंगलात फेकण्याची योजना तयार कण्यात आली. मात्र, टॅक्सीमध्ये मृतदेह घेऊन जात असतानाच त्यांचे कृत्य उघडकीस आले. या प्रकरणात हीथरला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. तर तिचा बॉयफ्रेंड टॉमीला १८ वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र, हीथरची चांगली वागणूक बघता तिला बालीच्या जेलमधून लवकरच सोडण्यात येणारे.
    शेफरनं कोर्टात हत्येची कबुली दिली आहे. मात्र शीला वॉन यांच्यासोबत सुरू असलेल्या वादात तो स्वतःचा बचाव करत होता, असं तो म्हणाला.