इस्लामिक कायद्याच्या मर्यादेतचा महिलांच्या हक्काचे -जबीहुल्ला मुजाहिद तालिबान प्रवक्ता

महिला समाजात खूप सक्रिय राहणार आहेत, परंतु इस्लामच्या चौकटीत'', तसेच त्यांना इतर देशांशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असून कोणत्याही प्रकारचे "अंतर्गत किंवा बाह्य शत्रू" नको आहेत.

    काबुल: तालिबान्यांनी काबुल ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या पहिल्या अधिकृत पत्रकार परिषदेमध्ये तालिबानने इस्लामिक कायद्याच्या(Islamic law)”मर्यादेत” महिलांच्या हक्कांचे (Women’s rights) संरक्षण करण्याचे सूतोवाच केले आहे. काबूलमधील(Kabul) प्रेसिडेंशियल पॅलेसमध्ये घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्ला मुजाहिद यांनी महिलांच्या हक्कांचे संरक्षण “इस्लामिक कायद्याच्या मर्यादेत” केले जाईल असे प्रतिपादन केले.

    ”महिला समाजात खूप सक्रिय राहणार आहेत, परंतु इस्लामच्या चौकटीत”, तसेच त्यांना इतर देशांशी शांततापूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा असून कोणत्याही प्रकारचे “अंतर्गत किंवा बाह्य शत्रू” नको आहेत. “आम्ही आमच्या शेजारील देशांना आश्वासन देऊ इच्छितो की आमच्या जमिनीचा त्यांच्याविरुद्ध गैरवापर होणार नसल्याचे तालिबानी प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.

    अफगाणिस्थानाचा उर्वरित भाग काबीज केल्यानंतर काबुलच्या वेशीवर थांबण्याची आमची योजना होती परंतु दुर्दैवाने अशरफ घनी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला “अकार्यक्षम” असल्याने ते सुरक्षा देऊ शकले नाहीत. मात्र आता आम्ही काबूलमधील सर्व आंतरराष्ट्रीय दूतावासाला व संस्थांना सुरक्षेचे आश्वासन देऊ ईच्छित असल्याचे तालिबान प्रवक्त्यांनी स्पष्ट केले आहे.

    तालिबानच्या प्रवक्त्याने महिलांच्या अधिकारांचा सन्मान करण्याचे वचन दिले, परंतु इस्लामिक कायद्याच्या मानदंडांमध्ये. तालिबान महिलांच्या हक्कांचे रक्षण करेल हे त्यांचे प्रतिपादन त्यांच्या पुनरुत्थानामुळे त्यांच्या पूर्वीच्या राजवटीतील महिलांमध्ये भीती परत आणली आहे. ज्यांनी स्त्रियांचे जीवन आणि अधिकार कठोरपणे प्रतिबंधित केले आहेत.