खरा खुनी कोण? जो बोलतो, तोच असतो ! पुतीन आणि बायडेन यांच्यात शाब्दिक युद्ध

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांची खुनी म्हणून संभावना केली होती. त्याला आता पुतीन यांनी उत्तर दिलंय. जो बोलतो, तोच असतो, असं म्हणत पुतीन यांनी बायडेन यांच्यावर पलटवार केलाय. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध चांगलेच ताणले जाऊ लागल्याचं दिसू लागलंय. 

    अमेरिका आणि रशिया यांच्यातील वाकयुद्ध चांगलंच रंगायला लागल्याचं दिसतंय. विशेषतः जो बायडेन हे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अमेरिका आणि रशिया यांच्यातील संघर्षाला पुन्हा एकदा धार चढताना दिसत आहे.

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाचे पंतप्रधान व्लादिमिर पुतीन यांची खुनी म्हणून संभावना केली होती. त्याला आता पुतीन यांनी उत्तर दिलंय. जो बोलतो, तोच असतो, असं म्हणत पुतीन यांनी बायडेन यांच्यावर पलटवार केलाय. त्यामुळे या दोन्ही देशांतील संबंध चांगलेच ताणले जाऊ लागल्याचं दिसू लागलंय.

    या दोन्ही देशांच्या प्रमुखांमध्ये आरोप प्रत्यारोप रंगत असले तरी एकमेकांतील संबंधांवर परिणाम होऊ देणार नाही, हे दोघांनीही स्पष्ट केलंय. एकमेकांवर होणारी व्यक्तीगत टीका वेगळी आणि देशांमध्ये असणारे व्यापारी संबंध वेगळे, असं पुतीन यांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे हे दोन्ही नेते कितीही भांडले, तरी त्याचा दोन्ही देशांतील संबंधांवर परिणाम होणार नसल्याचं चित्र दिसतंय.

    गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये पुतीन यांनी पु्न्हा एकदा रिपब्लिकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप बायडेन यांनी केला होता. अमेरिकन निवडणुकांमध्ये परकीय हस्तक्षेपाचा मुद्दा उपस्थित करत याचा तपास करून रशियावर कडक कारवाई करण्याचे संकेत बायडेन यांनी दिले होते. हे सांगतानाच पुतीन यांनी खुनी आणि हत्यारा अशी संभावनाही त्यांनी केली होती. याला आता पुतीन यांनी उत्तर दिलंय.

    जो स्वतः जसा असतो, तसंच जग आहे, असं त्याला वाटत असतं. त्यामुळेच बायडेन आपल्याला खुनी म्हणत असावेत, असा पलटवार पुतीन यांनी केलाय. आता या शाब्दिक युद्धाला पुढे काय वळण मिळतं, ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.