ebay

यूकेमधील एका धातू शोधकाला हॅम्पशायर, स्वेथलिंगमध्ये त्याच्या भावाच्या घराजवळ दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब (Bomb used in second world war) सापडला होता. त्याने ebay वर त्याची जाहिरात(Sell on ebay) केली. 

    ऑनलाईन बाजारात(Online Market) आजकाल काहीही विकलं जातं. मात्र यावेळी ebay वर चक्क बॉम्ब(Bomb Selling on ebay) विकण्याचा प्रयत्न केला गेला. यूकेमधील एका धातू शोधकाला हॅम्पशायर, स्वेथलिंगमध्ये त्याच्या भावाच्या घराजवळ दुसऱ्या महायुद्धातील बॉम्ब सापडला होता. त्याने ebay वर त्याची जाहिरात केली.  पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला अटक केली.

    मार्क विल्यम्स यांनी ई-कॉमर्स वेबसाईटवर प्राणघातक बॉम्ब विकण्याचा प्रयत्न केला. सोमवारी eBay वर बॉम्ब विक्रीसाठी ठेवला आहे हे पाहिल्यावर मिलिटेरियाचे कलेक्टर रल्फ शेर्विन यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. रल्फ शेर्विन यांनी विल्यम्स यांना तो बॉम्ब जिवंत असल्याचा मेसेज केला. त्यानंतर विल्यम्स यांनी तो धातूशोधक असल्याचे सांगितले. तसेच साउथॅम्प्टनमधील मुलांच्या खेळाच्या मैदानावर खोदकामात मिळाल्याचे सांगितले, अशी माहिती शेर्विनने  दिली आहे. तो बॉम्ब जिवंत असल्याचे शेर्विनने विल्यम्सला समजावून सांगितले. मात्र, त्याने दुर्लक्ष केले.

    शेर्विनने त्याला बॉम्ब खाली ठेवून पोलिसांना कळविण्याचे सांगितेले. मात्र विल्यम्सने दुर्लक्ष केले आली आणि बॉम्बची विक्री सुरु ठेवली. त्यावेळी पोलिसांना संपर्क करण्यात आला.

    शेर्विन म्हणाला, “मी हॅम्पशायर पोलिसांना कळविले. त्यानंतर मला समजले की त्यांनी ईबेशी संपर्क साधला. त्याचा पत्ता शोधला आणि त्याला ताब्यात घेतले. मी काही केले नसते तर मी स्वतःला कधीच क्षमा केली नसती.”

    मंगळवारी पोलीस विल्यम्सच्या ठिकाणी पोहचले आणि त्यांनी त्या जागेवर ५० मीटरची दोरी लावली आणि स्वेथलिंगमधील हेव्हनस्टोन वेच्या आसपासच्या कुटुंबांना घरातून बाहेर काढले. बॉम्ब नेण्यासाठी फायरमन आणि लष्कराची बॉम्ब डिस्पोजल टीम तिथे दाखल झाली आहे.