‘Ya’ is launched in the country in 2014; A country 7 years behind the world

जेव्हा तुम्ही परदेशात पर्यटनाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल त्यावेळी तुम्हाला इथोपिया देशाचे नाव चूकूनही सूचत नसेल. हे तर सोडाच कितीजणांना हा देश पृथ्वीतलावर आहे याबद्दलही माहित असेल की नाही यावर शंका आहे. या देशाची संस्कृती फार जुनी असून ती पाहिल्यावर इतिहासात गेल्यासारखे वाटते. पण तुम्हाला माहित आहे का हा देश जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी काळाने मागे आहे. या देशात सध्या 2014 हे साल सुरु आहे. याचे कारण म्हणजे या देशाचे कॅलेंडर वेगळे आहे. जगात ग्रेग्रियन कॅलेंडर वापरले जाते. मात्र इथे इथोपियन कॅलेंडर वापरले जाते ज्यात 13 महिने असतात. त्यामुळे हा देश इतर देशांच्या 7 वर्ष 3 महिने इतका मागे आहे.

    जगात असे अनेक देश आहेत जे त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे जगात प्रचलित आहेत. काही देश आपल्या संस्कृतीमुळे प्रसिद्ध आहेत तर काही पर्यटनामुळे. असा एक देश आहे जो आपल्या एका आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यामुळे प्रसिद्ध आहे. ते वैशिष्ट्य असे आहे की हा देश इतर देशांपेक्षा 7 वर्षांनी मागे आहे. म्हणजेच या देशात आता 2014 साल सुरु आहे.

    जेव्हा तुम्ही परदेशात पर्यटनाचा आनंद घेण्याचा विचार करत असाल त्यावेळी तुम्हाला इथोपिया देशाचे नाव चूकूनही सूचत नसेल. हे तर सोडाच कितीजणांना हा देश पृथ्वीतलावर आहे याबद्दलही माहित असेल की नाही यावर शंका आहे. या देशाची संस्कृती फार जुनी असून ती पाहिल्यावर इतिहासात गेल्यासारखे वाटते. पण तुम्हाला माहित आहे का हा देश जगातील इतर देशांपेक्षा कितीतरी काळाने मागे आहे. या देशात सध्या 2014 हे साल सुरु आहे. याचे कारण म्हणजे या देशाचे कॅलेंडर वेगळे आहे. जगात ग्रेग्रियन कॅलेंडर वापरले जाते. मात्र इथे इथोपियन कॅलेंडर वापरले जाते ज्यात 13 महिने असतात. त्यामुळे हा देश इतर देशांच्या 7 वर्ष 3 महिने इतका मागे आहे.

    इथोपियन कॅलेंडरमधील शेवटच्या महिन्याला पैग्युम म्हटले जाते. ज्यात 5 किंवा 6 दिवस असतात. हे अशा दिवसांच्या आठवणीत जोडले गेलेले आहे जे दिवस नेहमीच्या कॅलेंडरच्या दिवसांमध्ये मोजले जात नाहीत. यांचे सण, उत्सव, विशेष दिवसही याच कॅलेंडरनुसार आखले जातात. त्यामुळे येथील लोकांनी 11 डिसेंबर 2007 ला शंभर वर्ष पुर्ण झाल्याचा उत्सव केला होता. या कॅलेंडरचा शोध रोमन चर्चने इसवी सन 525 मध्ये लावला होता. तेव्हापासून हे कॅलेंडर येथे प्रचलित आहे. दरम्यान सध्या येथील काहीजण ग्रेग्रियन कॅलेंडरचाही वापर करतात. पर्यटकांना मात्र इथे आल्यावर या कॅलेंडरमुळे असुविधेचा सामना करावा लागतो. त्यामुळे इथोपियन कॅलेंडर आणि ग्रेग्रियन कॅलेंडर याचा मेळ साधुन दिवस आखले जातात.