A woman in London drank her own urine to escape the corona

    रस्त्यावरच्या सुलभ शौचालयात जायचे पैसे द्यावे लागतात, हे आपल्याला माहीतच आहे, पण जगात असेही एक खास शौचालय तयार करण्यात आले आहे जेथे जाणाऱ्या लोकांना पैसे दिले जातात. वाचून आश्चर्य वाटेल पण सगळ्यांसाठी हा चर्चेचा विषय बनला आहे. साऊथ कोरियामध्ये असलेल्या असलेले हे खास आणि वैशिष्ट्यपूर्ण सुलभ शौचालय इन्स्टिट्यूट ऑफ सायंस अँण्ड टेक्नॉलॉजी या युनिव्हर्सिटीच्या प्राध्यापकांनी तयार केले आहे.

    याचे नाव त्यांनी ‘बीवि’ असे ठेवण्यात आले आहे. येथील मलमूत्रापासून विजेची निर्मिती होते. हे खास शौचालय उल्सन युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये तयार करण्यात आले आहे. जे विद्यार्थी या शौचालयाचा वापर करतात, त्यांना बक्षीस म्हणून 10 युनिट डिजिटल चलन मिळते. या चलनाच्या मदतीने विद्यार्थी, पुस्तके, वह्या, खाण्याच्या वस्तू, फळे विकत घेऊ शकतात.

    हे शौचालय संपूर्णत: इकोफ्रेंडली आहे. कमी पाण्यात लोकांची गरज येथे भागवली जात असून व्हॅक्यूमच्या मदतीने मलमूत्र अंडरग्राउंडमध्ये असलेल्या टँकमध्ये आणि त्यानंतर बायोरिअॅक्टरमध्ये जमा होते. या प्रक्रियेनंतर मलमूत्रात असलेल्या मिथेन वायूचे विजेत रुपांतर होते. यामुळे युनिव्हर्सिटीला लागणारी विजेची गरज भरून निघते. यामुळे काही जण याला ‘सुपर वॉटर सेव्हिंग व्हॅक्युम शौचालय’ असेही म्हणतात.