Naked City : इथं कपडे घातल्यावर ठोठावला जातो दंड ; अगदी बँकेतही लोक नग्नच जातात

हे शहर आहे फ्रान्समधील (France) Cap D'Agde. नेकेड सिटी (Naked City) म्हणूनही हे शहर ओळखलं जातं. मेडिटेरियन समुद्राजवळ किनाऱ्यावर वसलेलं हे शहर. इथं तुम्हाला समुद्रकिनारी कपडे न घालताच सनबाथ घेत बसलेले पर्यटक तर दिसतीलच.

    पॅरिस : काही देशांमध्ये पूर्ण शरीर झाकलं जाईल असे कपडे घालणं बंधनकारक असतं. तर बहुतेक देशांमध्ये शरीराचा नको तो भाग दिसेल किंवा शॉर्ट, डिप नेक असे कपडे सार्वजनिक ठिकाणी घालण्याची परवानगी नसते (Public Nudity). कपड्यांशिवाय सार्वजिनिक ठिकाणी कुणी दिसलं तर त्यांना शिक्षा केली जाते.

    असं असताना तुम्हाला जर सांगितलं की एक ठिकाण आहे, जिथं खरंतर सार्वजनिक ठिकाणीच कपडे घातल्यावर शिक्षा केली जाते. इथं सार्वजनिक ठिकाणी कपडे घालण्यास सक्त मनाई आहे (City where wearing clothes not allowed). हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं ना? हे शहर नेमकं आहे तरी कोणतं हे जाणून घेण्याची उत्सुकता आता तुम्हाला वाटत असेल.

    हे शहर आहे फ्रान्समधील (France) Cap D’Agde. नेकेड सिटी (Naked City) म्हणूनही हे शहर ओळखलं जातं. मेडिटेरियन समुद्राजवळ किनाऱ्यावर वसलेलं हे शहर. इथं तुम्हाला समुद्रकिनारी कपडे न घालताच सनबाथ घेत बसलेले पर्यटक तर दिसतीलच. पण सुपरमार्केट, रेस्टॉरंट, पार्लर आणि अगदी बँकेतही तुम्हाला सर्वजण बिना कपड्याचेच दिसतील.

    १९५८ पासूनच ही न्यूट सिटी वसली आहे. १९७० नंतर तर इथं २ किलोमीटरपर्यंत कपडे घालण्यास मनाईच केली आहे. दर तुम्ही इथं कपडे घातले तर तुम्हाला दंड भरावा लागतो. ज्याला नेकेड टॅक्स म्हणतात.

    दरवर्षी या शहरात जगातील कित्येक कपल हनीमूनसाठी येतात. हे लोक प्रत्येक ठिकाणी कपड्यांशिवायच फिरतात. इथं फिरायला गेलेल्या एका कपलने तर या ठिकाणचे अनेक फोटोही शेअर केले आहेत. सेक्स टुरिस्टसाठी तर हे उत्तम ठिकाण आहे. इथं तुम्हाला सेक्स वर्कर्स आणि अडल्ट शॉप्सही भरपूर दिसतील.

    ही नेकेट सिटी सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. याला किती तरी लोक अश्लीलतेचा गड मानतात. इथं अनेक नेकेड पार्टीज आयोजित केल्या जातात. जे शहाराच्या संस्कारांचं हनन असल्याचा आरोप अनेक जण करतात.