The son murdered the father who was harassing the mother for money
प्रतीकात्मक फोटो

एका तरुणाला केवळ मोबाईलमध्ये आपत्तीजनक फोटो ठेवण्यावरून मृत्यूची शिक्षा देण्यात आली आहे. हा मुलगा अल्पवयीन असताना त्याला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. ही घटना सौदी अरेबियातील असून हा तरुण अल्पसंख्यांक शिया समुदायातील होता. आरोपीचे नाव मुस्तफा अल दर्विश असे आहे. त्याचे वय 26 वर्ष होते.

    सौदी : एका तरुणाला केवळ मोबाईलमध्ये आपत्तीजनक फोटो ठेवण्यावरून मृत्यूची शिक्षा देण्यात आली आहे. हा मुलगा अल्पवयीन असताना त्याला अटक करण्यात आली होती. हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे. ही घटना सौदी अरेबियातील असून हा तरुण अल्पसंख्यांक शिया समुदायातील होता. आरोपीचे नाव मुस्तफा अल दर्विश असे आहे. त्याचे वय 26 वर्ष होते.

    सौदी अरेबियाने असे अनेकदा म्हटले आहे, की ते अल्पवयीन मुलांना मृत्यूची शिक्षा देत नाहीत. मात्र, तरीही मुस्तफाला मृत्यूची शिक्षा देण्यात आली. मुस्तफाला ज्या आरोपात अटक करण्यात आली होती, तो गुन्हा त्याने 17 वर्ष आधी केला होता. मुस्तफावर असा आरोप होता, की तो वयाच्या 17 व्या वर्षी अरब स्प्रिंगच्या एका प्रदर्शनात सामील झाला होता. मुस्तफा शिया समाजातील होता. पोलिसांना मुस्तफाच्या फोनमध्ये एक आपत्तीजनक फोटो आढळला होता. याच कारणामुळे त्याला मृत्यूची शिक्षा सुनावण्यात आली.

    सौदी अरब पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मुस्तफाला 2015 मध्ये त्याच्या दोन साथीदारांसह अटक पहिल्यांदा अटक करण्यात आली होती. त्याच्या मोबाईलमध्ये आढळलेला फोटो देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक होता. मुस्तफा तब्बल 10 दंगलींमध्ये सामील झाला होता. मुस्तफानं मृत्यूआधी कोर्टात म्हटले होते, की सहा वर्ष त्याच्या डोक्यावर मृत्यूची टांगती तलवार होती. पोलिसांच्या टॉर्चरला कंटाळून त्याने आपला गुन्हा मान्य केला. मुस्तफाच्या कुटुंबीयांनी म्हटले, की त्याचा मृत्यू हा संपूर्ण कुटुंबाच्या मृत्यूसारखा आहे. फोनमध्ये केवळ एक आपत्तीजनक फोटो आढळल्याने त्याला मृत्यूची शिक्षा भोगावी लागली आहे.