पंतप्रधान मोदी भारतात परतल्यावर बांगलादेशातील मंदिरावर हल्ले, १० जणांचा मृत्यू

बांग्लादेशची राजधानी ढाकात शुक्रवारी झालेल्या आंदोलनात अनेक आंदोलक जखमी झले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या तसेच गोळीबार केला. परंतु रविवारी हा जमाव अधिक हिंसक झाला आणि त्यांनी का ट्रेनवर हल्ला केला.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांग्लादेशचा दौरा केला. या विरोधात बांग्लादेशमधील काही कट्टर मुस्लिम संघटनानी विरोध केला. मोदी मायदेशी परतल्यानंतर या विरोधाला हिंसक वळण लागले आणि त्यात आतापर्यंत १० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक आंदोलकांनी हिंदू मंदिराला लक्ष्य केले असून त्यांची तोडफोड केली आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने पोलीस आणि स्थानिक पत्रकाराच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

     

    का झाला विरोध ?
    बांगलादेश स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी बांगलादेश दौऱ्यावर होते. मोदी हे भारतातील मुस्लिमांशी भेदभाव करत असल्याचा आरोप करत त्यांच्या दौऱ्याला विरोध झाला.बांग्लादेशमधील एका कट्टर मुस्लिम संघटनेने रविवारी हिंदू मंदिर आणि ट्रेनवर हल्ला केला. पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात या संघटनेने आंदोलन पुकारले होते, या आंदोलनाला हिंसक वळण लागले. अनेक ठिकाणी आंदोलक आणि पोलिसांमध्ये हाणामारी झली. या घटनेत आतापर्यंत १० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे.

    बांग्लादेशची राजधानी ढाकात शुक्रवारी झालेल्या आंदोलनात अनेक आंदोलक जखमी झले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या तसेच गोळीबार केला. परंतु रविवारी हा जमाव अधिक हिंसक झाला आणि त्यांनी का ट्रेनवर हल्ला केला. त्यात ट्रेनचे इंजिन आणि कोचचे अतोनात नुकसान झाले. अनेक सरकारी कार्यालयांना आगी लावण्यत आल्या तसेच हिंदू मंदिरांना लक्ष्य करत त्यांचीही नासधूस करण्यात आली.