अफगाणिस्थानात तालिबान राजवटीचे १०० दिवस, उपासमारी आणि गरिबीने जनता हैराण ; एका मुलाला वाचवण्यासाठी दुसऱ्या मुलाला विकण्याची वेळ

तालिबानच्या सत्तेला जागीतल मान्यवर देशांनी अद्यापही परावनगी दिलेली नाही. चीन आणि तुर्की वगळता सगळेचे जण या नव्या राजवटीकडे संशयाच्या नजेरेने पाहत आहेत. यातच आर्थिक मदतही अनेक देशांनी बंद केली आहे. विजेचं संकटही आ वासून उभं आहे. अशा स्थितीत जगायचं कसं असा प्रश्न अफगाणी नागरिकांना पडला आहे.

  काबूल : अमेरिकन सैन्य गेल्यानंतर, अफगाणिस्थानात सत्ता हस्तगत केलेल्या तालिबानच्या राटवटीला १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या १०० दिवसांत, अफगाणिस्थानची स्थिती आधीच वाईट होती, ती आता अतिशय वाईट अशा अवस्थेत पोहचली आहे. अर्थव्यवस्था पूर्णपणे नष्ट झाली असून, मोठ्या संख्येने अफगाणी नागरिक देश सोडण्याच्या प्रयत्नात आहेत. अफगाणिस्थानातील स्थिती आता एखाद्या शोकांतिकेच्या मार्गावर निघाल्यासारखी झाली आहे.

  भूकबळीचे संकट
  अफगाणिस्थानात महागाई, उपासमारी, गरिबी, दुष्काळ ही सगळी संकटे ऐकाचवेळी ओढवलेली आहेत. अफगाणिस्थानात सर्वाधिक भूकबळी डिसेंबरपर्यंत पडतील आणि भयानक दुष्काळाचा सामना अफगाणिस्थानाला करावा लागेल, अशी शक्यता संयुक्त राष्ट्रसंघाने व्यक्त केली आहे.

  मुली-महिलांची वाईट स्थिती
  देशातील मुलींची आणि स्त्रीयांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. इथली परिस्थिती आधीच महिलांसाठी फारशी सुखकर न्वहती, त्या व्हानात आता खूपच भर पडली आहे. अनेक मुलींचं शिक्षण, उच्च शिक्षण थांबले आहे. तर अनेक मुली-महिला या गेल्या १०० दिवसांत घराच्या बाहेरही पडलेल्या नाहीत. आई-बाप आपल्या मुलींना शाळेत पाठवण्यास धजावत नाहीयेत. तालिबान आपल्या घराचा दरवाजा वाजवणार तर नाही ना, अशी भीती प्रत्येकाच्या मनात आहे.

  घर चालवायचे कसे हा प्रश्न
  देशात सध्या कडाक्याची थंडी सुरु झाली आहे. अशा स्थितीत ना अंगभर पडे आहेत, ना खायला पुरेसा अन्नसाठा उपलब्ध आहे. अशा स्थितीत जगायचं असेल तर घरातील एखाद्या लगान मुलाची विक्री करुन, त्या पैशांवर संपूर्म कुटुंबाटी गुजराण करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. ४० ते ५० हजारांत मुलाची विक्री करुन या पैशांवर येत्या काही काळात कुटुंबाची गुजराण करण्याचा प्रयत्न काही कुटुंब करतायेत.

  देश सोडण्याचा प्रयत्न
  अनेक नागरिक हा देश सोडून दुसरीकडे कुठे आश्रय मिळतो आहे का, याची चाचपणी करीत आहेत. दुसऱ्या देशात जाण्यासाठी पेशांची जुळाजुळव करण्यात येते आहे. यासह तालिबान आणि देशातील कट्टर पंथियांमधील अंतर्गत गृहकलहाचा धोकाही वाढतो आहे. अशा स्थितीत हिंसा झाली तर अनेक घरे, कुटुंब उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

  आंतरराष्ट्रीय मदतही मिळेना
  तालिबानच्या सत्तेला जागीतल मान्यवर देशांनी अद्यापही परावनगी दिलेली नाही. चीन आणि तुर्की वगळता सगळेचे जण या नव्या राजवटीकडे संशयाच्या नजेरेने पाहत आहेत. यातच आर्थिक मदतही अनेक देशांनी बंद केली आहे. विजेचं संकटही आ वासून उभं आहे. अशा स्थितीत जगायचं कसं असा प्रश्न अफगाणी नागरिकांना पडला आहे. तालिबान राजवटीच्या १०० दिवसांचे हे फलित आहे. दहशतवादी कृत्य करणे आणि प्रत्यक्ष राजवट सांभाळणे, यात किती अंतर असते, याचा प्रत्यय कदाचित या सर्व काळात तालिबानी नेत्यांनाही आला असावा. आगामी भविष्यात तालिबानी राजवट आणि अफगाणिस्थानातील रहिवासी यांचे काय होणार, हा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे