
सुरुवातीला दोन बसमधील प्रवाशांना स्थानिक निवासस्थानांमध्ये नेण्यात आले. काही स्थलांतरितांनी कडाक्याच्या थंडीतदेखील टी-शर्ट घातले आहेत. त्यांना उबदार करडे तसेच ब्लँकेट देण्यात आले असून दुसऱ्या बसमधील लोकांना स्थानिक चर्चमध्ये पाठविण्यात आले आहे.
वॉशिंग्टन : अमेरिकेत गेल्या काही दिवसांपासून कडाक्याची थंडी पडली आहे. त्यातच टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट (Greg Abott) यांनी १३० स्थलांतरितांना (Immigrant) उपराष्ट्रपती कमला हॅरिस (Kamala Harris) यांच्या घराबाहेर उभे करण्यासाठी आणून सोडले. यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. डेमोक्रॅटिक पक्षाच्या (Democratic Party) सरकारने स्थलांतरित कायद्यामुळे संतप्त झालेल्या ग्रेग अॅबॉट यांनी तीन बसेस वॉशिंग्टनला पाठवल्या. ज्यामध्ये युकाडोर, व्हेनेझुएला, क्युबा, निकाराग्वा, पेरू आणि कोलंबिया (Colombia) येथील स्थलांतरितांचा समावेश आहे.
वॉशिंग्टन डीसीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनसार, सुरुवातीला दोन बसमधील प्रवाशांना स्थानिक निवासस्थानांमध्ये नेण्यात आले. काही स्थलांतरितांनी कडाक्याच्या थंडीतदेखील टी-शर्ट घातले आहेत. त्यांना उबदार करडे तसेच ब्लँकेट देण्यात आले असून दुसऱ्या बसमधील लोकांना स्थानिक चर्चमध्ये पाठविण्यात आले आहे.
व्हाईट हाऊसचे प्रवक्ते अब्दुल्ला हसन यांनी या संदर्भात एक निवेदन जारी केले. ग्रेग अॅबॉटने एवढ्या जीवघेण्या थंडीच्या वातावरणात मुलांना सोडले, ही गोष्ट लाजीरवाणी आहे. अशा राजकीय खेळीने काहीही साध्य होत नाही. यातून लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाल्या आहेत. राष्ट्रपतींसह रिपब्लिक पक्षाच्या नेत्यांना स्थलांतरितांच्या प्रश्नावर तोडगा काढायचा आहे, असे त्यांनी सांगितले.
ग्रेग अॅबॉट यांनी २० डिसेंबर रोजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना २० इमिग्रेशन कायदे कडक करण्यासाठी पत्र लिहिले. त्यात टेक्सासकडे इतर देशांतून येणाऱ्या स्थलांतरितांचा ओढा वाढत आहे. टेक्सासमधून स्थलांतरितांना आपण मुद्दामहून इतर शहरांमध्ये सोडत असल्याचे म्हटले होते.