
डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनम अल-गैथी यांनी सांगितले की, पुरामुळे डेरना शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शहरातील मृतांची संख्या 18 ते 20 हजारांवर पोहोचली आहे.
लिबियामध्ये डॅनियल वादळानं (Daniel Storm) सध्या धुमाकूळ घातला आहे. यामुळे पुर आल्यान (Libya Flood) प्रचंड विध्वंस होताना दिसत आहे. भीषण पुरामुळे २० हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. समुद्राचा पूर शहरात दाखल झाला होता आणि त्याच्या पाण्यासह अनेक लोक वाहून गेले. यातील बहुतांश जणांचा मृत्यू झाला आहे मात्र त्यांचा मृतदेह शोधण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत. लिबियातील डेरना शहराचा जवळपास निम्मा भाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.
पुरामुळे डेरना शहरात प्रचंड नुकसान
डेरना शहराचे महापौर अब्दुलमेनम अल-गैथी यांनी सांगितले की, पुरामुळे डेरना शहरात मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शहरातील मृतांची संख्या 18 ते 20 हजारांवर पोहोचली आहे. एवढेच नाही तर आता साथीचे आजार पसरण्याची मोठी भीती असल्याचे त्यांनी सांगितले. पाण्यात मृतदेह कुजत असून पाण्याबरोबर घाणही रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
जागतिक हवामान संघटनेचं केली टिका
लिबियातील इतके मृत्यू टाळता आले असते, जागतिक हवामान संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेने म्हटले आहे की, लीबिया गेल्या दशकापासून गृहयुद्धाने त्रस्त आहे आणि देशावर दोन भिन्न सरकारे राज्य करत आहेत. लिबियात हवामान खातेच सक्रिय नाही, अशी परिस्थिती आहे. देशात हवामान खाते सक्रिय असते तर काही अंदाज वर्तवले गेले असते आणि मग लोकांचे प्राण वाचवता आले असते. या जागतिक संस्थेने म्हटले आहे की, पुराचा अंदाज वेळीच कळला असता, तर लोकांना आधीच कुठेतरी हलवले गेले असते. याशिवाय बचाव कार्यासाठी पुरेसा वेळही उपलब्ध होईल.
काही मिनिटांतच इमारती कोसळल्या, अनेकांनी गमावलं अख्ख कुटुंब
डेरना प्रमाणे डेर्मा शहरातील हा पूर इतका भीषण होता की काही मिनिटांतच मोठमोठ्या इमारती कोसळल्या. अशी अनेक कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत आणि एकही सदस्य शिल्लक राहिला नाही. एका व्यक्तीने सांगितले की या आपत्तीत त्याने आपल्या संयुक्त कुटुंबातील 13 सदस्य गमावले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने मृतदेहांचे सामूहिक दफन केले जात असून कबर खोदल्या जात आहेत.